Beed News: उधारीवर कपडे दिले नाहीत, चौघांनी दुकानदाराला…, बीडमध्ये खळबळ

Last Updated:

Beed News: दोघा तरुणांनी दुकानात खरेदी केली आणि कपडे उधारीवर देण्याची मागणी केली. पण दुकानदाराने नकार दिल्याने वाद झाला.

Beed News: उधारीवर कपडे दिले नाहीत, चौघांनी दुकानदाराला…, बीडमध्ये खळबळ
Beed News: उधारीवर कपडे दिले नाहीत, चौघांनी दुकानदाराला…, बीडमध्ये खळबळ
बीड : उधारीवर कपडे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका तरुण कापड दुकानदारावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला. अंबाजोगाई शहरातील गजबजलेल्या मध्यवर्ती भागात ही खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे.
पाटील चौकात खडकपुरा परिसरातील संकेत विनोद नरके (वय 21) यांचे कपड्याचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पृथ्वीराज जोगदंड आणि अमन मोटेराव हे दोघे दुकानात आले. त्यांनी काही कपडे पसंत करून पैसे न देता उधारीवर देण्याची मागणी केली. मात्र, संकेत नरके यांनी स्पष्ट नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपींनी संकेतला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून निघून गेले.
advertisement
थोड्याच वेळात पृथ्वीराज आणि अमन हे आपल्या साथीदारांसह पुन्हा दुकानात परतले. यावेळी त्यांच्यासोबत वीर शिंदे आणि दोनगहू (रा. परळी वेस) हेही होते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे दुकानात तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही क्षणातच आरोपींनी संकेतवर हल्ला चढवला. पृथ्वीराज जोगदंड याने कोयत्याने संकेतच्या उजव्या भुवईच्या बाजूला वार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
advertisement
हल्ल्यादरम्यान अमन मोटेराव याने दगड फेकून मारल्याने संकेतचा एक दात तुटला, तर उर्वरित आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अचानक झालेल्या आरडाओरड्याने परिसरातील इतर दुकानदार आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हस्तक्षेप करून भांडण थांबवले आणि जखमी संकेतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेप्रकरणी संकेत नरके यांनी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून चारही आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दिवसाढवळ्या व्यापारी भागात घडलेल्या या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed News: उधारीवर कपडे दिले नाहीत, चौघांनी दुकानदाराला…, बीडमध्ये खळबळ
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement