Beed Crime : बीडच्या 'लव्ह ट्रँगल' हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, CCTV व्हिडीओ पाहून पायाखालची जमीन हादरली!

Last Updated:

Beed Crime News : 'लव्ह ट्रँगल' हत्या प्रकरणाने बीडला हादरवून सोडलं आहे. एका पुरुषासाठी दोन महिलांमध्ये निर्माण झालेल्या वादातून बीडमध्ये धक्कादायक खुनाची घटना घडली आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने वृंदावणी सतीश फरतारे हिने आपल्या मैत्रीण आयोध्या राहुल व्हरकटे हिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Beed Crime Love triangle Murder case CCTV Explosed
Beed Crime Love triangle Murder case CCTV Explosed
Beed Crime News : बीड जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका महिलेनं लव्ह ट्रँगलतून आपल्याच एका मैत्रिणीची हत्या केली आहे. आरोपी महिलेनं पीडित महिलेला आपल्या घरी बोलावून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिने मैत्रिणीचा मृतदेह एका बॉक्समध्ये भरून स्कूटीवरून शहराच्या बाहेर नेऊन टाकला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला. या व्हिडीओमध्ये दोघजणं अॅक्टिवावर एक भलामोठा बॉक्स घेऊ जाताना दिसतायेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय दिसलं? 

पोलिसांनी तपास केला असता अयोध्याच्या एका मैत्रिणीने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांना वृंदावनीवर संशय बळावला. पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता, १९ तारखेला वृंदावनी आरोपी महिलेच्या घरी जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली. मात्र ती घरातून बाहेर पडल्याचं दिसलं नाही. शिवाय आरोपी महिला एक मोठा बॉक्स घेऊन घराबाहेर जात असल्याचं देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलं. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने हत्येची कबुली दिली.
advertisement

पाहा Video

advertisement
आयोध्या ही काही महिन्यांपूर्वी होमगार्डमध्ये भरती झाली होती. वृंदावणीचे एका पुरुषाशी प्रेमसंबंध सुरू होते. पण दीड वर्षांपूर्वी त्याची ओळख आयोध्याशी झाली आणि त्यानंतर त्याने वृंदावणीला बाजूला करून आयोध्याशी बोलणे सुरू केले. आयोध्याचे पती चार वर्षांपूर्वी अपघातात मयत झाले होते. त्यामुळे प्रियकराने आपल्याला दुरावल्याचा राग वृंदावणीला मनात होता.
दरम्यान, आरोपींनी मृतदेह लपवण्यासाठी वृंदावणीने त्याला खोक्यात भरले. मुलगा शाळेतून आल्यावर ‘कचरा टाकायचा आहे’ असे सांगून त्याला दुचाकीवर घेऊन गेली. शेजाऱ्याकडून स्कूटी आणून घेतली आणि मुलाला चालवायला लावले. स्वतः मागे बसून तिने मृतदेह उमरद जहांगीर परिसरातील नाल्यात फेकून दिला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Crime : बीडच्या 'लव्ह ट्रँगल' हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, CCTV व्हिडीओ पाहून पायाखालची जमीन हादरली!
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement