advertisement

वाळत टाकलेले कपडे काढायला गेली, मक्यातून आलं संकट, 50 फूट ओढत नेलं, मग काय झालं?

Last Updated:

Beed News: उन्हात वाळत टाकलेले कपडे काढायला गेलेल्या महिलेसमोर साक्षात काळ उभा राहिला. काही कळायच्या आत तिला बिबट्याने ओढत नेलं.

वाळत टाकलेले कपडे काढायला गेली, मक्यातून आलं संकट, 50 फूट ओढत नेलं, मग काय झालं?
वाळत टाकलेले कपडे काढायला गेली, मक्यातून आलं संकट, 50 फूट ओढत नेलं, मग काय झालं?
बीड: पुणे, मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही भागात वन्यप्राण्यांची दहशत चिंतेचा विषय बनला आहे. बीडमध्ये देखील बिबट्याची दहशत पुन्हा वाढू लागली आहे. नुकतेच आष्टी तालुक्यातील बावी दरेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच वाळूजमध्ये बिबट्याने एका महिलेवर हल्ला केला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात वाळूजमधील खंडोबा वस्ती परिसरात राहणाऱ्या योगिता खाडे (वय 29) जखमी झाल्या आहेत. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास योगिता खाडे घरासमोर वाळत टाकलेले कपडे काढत होत्या. त्याच वेळी मक्याच्या शेतातून अचानक बाहेर आलेल्या बिबट्याने त्यांच्या दिशेने झेप घेत हल्ला चढविला. या धक्कादायक हल्ल्यात बिबट्याने त्यांच्या हातातील कपड्यांना पकडून तब्बल 50 फूट अंतरापर्यंत त्यांना फरफटत नेले.
advertisement
घटनेच्या वेळी घरातील अन्य सदस्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने त्यांना सोडून पुन्हा शेतात पलायन केले. सुदैवाने योगिता खाडे यांना किरकोळ दुखापत झाली असून स्थानिकांनी त्यांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन ठसे आणि परिस्थितीचा तपास सुरू केला आहे.
advertisement
या हल्ल्यामुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वी 29 नोव्हेंबर 2020 रोजी पारगाव जोगेश्वरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात सुरेखा बळे या महिलेचा मृत्यू झाला होता. वाळूजपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर घडलेली ती घटना अजूनही लोकांच्या स्मरणात असताना, नेमक्या पाच वर्षांनी पुन्हा अशीच घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
advertisement
वाळूज परिसरात वाढलेल्या वन्य प्राण्यांच्या हालचालींमुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्थानिकांनी वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, वनविभागाने रहिवाशांना सावध राहण्याचे आवाहन केले असून परिसरात पाळत ठेवण्यासाठी अतिरिक्त पथक तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
वाळत टाकलेले कपडे काढायला गेली, मक्यातून आलं संकट, 50 फूट ओढत नेलं, मग काय झालं?
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement