भंडाऱ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Bhandara News: नंदू रहांगडाले हे भाजपच्या तिकिटावर पंचायत समिती सदस्य निवडून आले असले तरी, ते शरद पवार पक्षाचे माजी आमदार चरण वाघमारे यांचे कट्टर समर्थक म्हणूनही ओळखले जातात.
रवी सपाटे, भंडारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने नेते पदाधिकाऱ्यांच्या या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. स्थानिक समीकरणांचा अंदाज घेऊन आणि भविष्यातील संधी हेरून नेते पदाधिकारी पक्ष बदल करीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत होणार असल्याच्या चर्चा आहेत. तत्पूर्वी विदर्भात सत्ताधारी मित्र पक्षातच कुरघोडींच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.
भंडाऱ्याच्या तुमसर पंचायत समितीचे भाजपचे माजी पंचायत समिती सभापती नंदू रहांगडाले यांनी त्यांच्या समर्थकांसह आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय.
नंदू रहांगडाले हे सध्या भाजपचे पंचायत समिती गट नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वात नंदु रहांगडाले यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
advertisement
तुमसर नगरपालिकेची आगामी काळात निवडणूक होत आहे. या दृष्टीने हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जातोय. नंदू रहांगडाले हे भाजपच्या तिकिटावर पंचायत समिती सदस्य निवडून आले असले तरी, ते शरद पवार पक्षाचे माजी आमदार चरण वाघमारे यांचे कट्टर समर्थक म्हणूनही ओळखले जातात.
राष्ट्रवादीचे संघटन अधिक बळकट होणार, प्रफुल पटेल यांना विश्वास
advertisement
तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती नंदू राहांगडाले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक बळकट होणार असून स्थानिक पातळीवर पक्षाला निश्चितच नवी ऊर्जा आणि बळकटी मिळणार आहे. नवीन सहकाऱ्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
advertisement
या प्रसंगी आमदार राजु कारेमोरे, तुमसर विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे, तसेच तुमसर अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष यासिन छवारे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Location :
Bhandara,Maharashtra
First Published :
September 13, 2025 4:49 PM IST