Raigad News : भरत गोगावलेंना पुन्हा डावललं, सुनील तटकरेंच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेतून नाव वगळलं

Last Updated:

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे भूमिपूजन होणार आहे. याच कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे आहेत. पण भरत गोगावले यांचे नाव नसल्याने चर्चेला तोंड फुटलं आहे.

tatkare vs gogavale
tatkare vs gogavale
Raigad News : मोहन जाधव, रायगड : पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच असलेले मंत्री भरतशेठ गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे मध्यंतरी एकाच मंचावर आले होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद संपूष्ठात आल्याची चर्चा होती. पण आता पुन्हा मंत्री भरत गोगावले यांचा गेम झाला आहे. कारण मंत्री भरत गोगावले यांचं नाव पुन्हा निमंत्रण पत्रिकेतून डावलण्यात आले आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे भूमिपूजन होणार आहे. याच कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे आहेत. पण भरत गोगावले यांचे नाव नसल्याने चर्चेला तोंड फुटलं आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर या रखडलेल्या बायपासच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून मंत्री भरत गोगावले यांना पुन्हा एकदा डावलण्याचा प्रकार समोर आलाय.
मागील आठवड्यात रोहा येथे डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या सभागृहाच्या कार्यक्रमाला देखील मंत्री भरत गोगावले यांना डावलण्यात आलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये मोठा वादंक निर्माण झाला होता. त्यानंतर आज होणाऱ्या माणगाव आणि इंदापूर बायपास कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि भाजप नेत्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत छापण्यात आली आहेत. मात्र मंत्री भरत गोगावले यांना डावळण्याचा प्रकार निमंत्रण पत्रिकेतून दिसून येतोय.त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मंत्री गोगावले यांना महायुतीमध्ये सुरू आलेली अंतर्गत वादाचे संकेत यामधून मिळत आहेत.
advertisement
दरम्यान याआधी गोगावले यांच्याबरोबर एकाच मंचावर आल्याच्या प्रश्नावर आदिती तटकरे म्हणाल्या, "आम्ही काही पहिल्यांदाच एकत्र आलो नाही. याआधीही दोन तीन वेळा जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही एकत्र आलो आहे. पालकमंत्रिपदाचा विषय महायुतीचे तिन्ही नेते एकत्रित बसून सोडवतील. मात्र जिल्ह्याचा प्रश्न येईल तिथे आम्ही सगळे मतभेद विसरून तेवढ्याच ताकदीने एकत्र येऊ"
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raigad News : भरत गोगावलेंना पुन्हा डावललं, सुनील तटकरेंच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेतून नाव वगळलं
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement