Bhendwal Bhavishyavani: ऑगस्टमध्ये पाऊस धो धो कोसळणार, अवकाळीचंही संकट, 'भेंडवळ'च्या घटमांडणीचा अंदाज काय?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Bhendwal Bhavishyavani: यंदा पिक पावसासह देशाचा राजा कायम असणार की नाही, याबाबत भेंडवळच्या घट मांडणीमध्ये काय भाकीत केली जातात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
राहुल खंडारे, प्रतिनिधी, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवडच्या प्रसिद्ध अशा घट मांडणीचे भाकीत जाहीर करण्यात आली आहे. पिक पावसा संदर्भात भविष्यवाणीसाठी बुलढाणा येथील भेंडवळची घटमांडणी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इतरही गोष्टींवर भाकीत या भेंडवळच्या घट मांडणीतून केली जातात. यंदा पिक पावसासह देशाचा राजा कायम असणार की नाही याबाबत भेंडवळच्या घट मांडणीमध्ये काय भाकीत केली जातात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यानंतर बुधवारी भेंडवळने आपलं भाकीत जाहीर केले आहे.
वाघ महाराज बंधूकडून भाकिते जाहीर करण्यात आली. भेंडवळने राज्याच्या पिक पाणी कसं असेल, यासोबत राजकारणावरही भाष्य केले. भेंडवळची मांडणी ही 370 वर्षांपासूनची स्थानिक परंपरा आहे. या भाकितांवर स्थानिकांचा विश्वास असून त्यादृष्टीने वर्षभरातील पिक पाण्याचे नियोजन करतात.
भेंडवळमध्ये भाकित काय?
भेंडवळमधील भाकितानुसार, जूनमध्ये पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज आहे. तर, जुलैमध्येही पाऊस कमी होणार आहे. या दोन महिन्यात पाऊस कमी झाल्यानंतर मात्र ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. तर, सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस होणार आहे.
advertisement
यंदाही अवकाळीचा धोका
यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना अवकाळीचा धोका संभवतो, असं भाकित भेंडवळच्या घटमांडणीत करण्यात आले.
नैसर्गिक आपत्तीचंही संकट
यंदा देशात नैसर्गिक जसे पूर, भूकंप, युद्धजन्यआपत्तीचं प्रमाण जास्त असेल असं भाकित वर्तवण्यात आले आहे. देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई असेल. राजा कायम असेल पण कायम तणावात असेल असंही भाकित वर्तवण्यात येणार आहे.
advertisement
भेंडवळच्या भाकिताला शास्त्रीय आधार?
घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. मात्र, अनेक वर्षांची ही परंपरा भेंडवळमधील ग्रामस्थ पाळत आहेत. स्थानिकांचा विश्वास या मांडणीवर आहे. पाऊस, पिक पाणी, राजकीय स्थितीचा अंदाज येण्यासाठी या भाकिताकडे अनेकांचे लक्ष असते.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
May 01, 2025 8:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhendwal Bhavishyavani: ऑगस्टमध्ये पाऊस धो धो कोसळणार, अवकाळीचंही संकट, 'भेंडवळ'च्या घटमांडणीचा अंदाज काय?


