advertisement

Congress BJP: महाराष्ट्राच्या राजकारणात चमत्कार! भाजपच्या उमेदवारासाठी चक्क काँग्रेसचा 'व्हिप'; भिवंडीत नवा भूकंप!

Last Updated:

Congress BJP: राज्यात शत प्रतिशतचा नारा देत आपलं वर्चस्व वाढवणाऱ्या भाजपला काँग्रेसकडून आता शह देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. भाजपमध्ये फूट पडल्याचे चित्र समोर येताच काँग्रेसनं डाव टाकला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात चमत्कार! भाजपच्या उमेदवारासाठी चक्क काँग्रेसचा 'व्हिप'; भिवंडीत नवा भूकंप!
महाराष्ट्राच्या राजकारणात चमत्कार! भाजपच्या उमेदवारासाठी चक्क काँग्रेसचा 'व्हिप'; भिवंडीत नवा भूकंप!
ठाणे: महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही वर्षात चांगल्याच उलथापालथी आणि त्यातून काही नवीन समीकरणं जुळत असल्याचे दिसत आहे. राज्यात शत प्रतिशतचा नारा देत आपलं वर्चस्व वाढवणाऱ्या भाजपला काँग्रेसकडून आता शह देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. भाजपमध्ये फूट पडल्याचे चित्र समोर येताच काँग्रेसनं डाव टाकला आहे.
भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीने आता अत्यंत नाट्यमय वळण घेतले आहे. राज्याच्या राजकारणात कधीही न घडलेली गोष्ट पाहायला मिळत आहे. भाजपचे महापौरपदाचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना मतदान करण्यासाठी चक्क काँग्रेसने 'व्हिप' जारी केला आहे. उपमहापौर पदी काँग्रेसचे भाजप आणि काँग्रेसच्या या छुप्या युतीमुळे भिवंडीत राजकीय खळबळ उडाली आहे.

भाजपमध्ये उभी फूट, दोन उमेदवार रिंगणात

advertisement
एकीकडे भाजपने अधिकृतपणे स्नेहा पाटील यांना उमेदवारी दिली असताना, दुसरीकडे नारायण चौधरी यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. भाजपच्या २२ नगरसेवकांपैकी १३ नगरसेवक चौधरी यांच्या पाठीशी आहेत, तर उर्वरित ९ नगरसेवक स्नेहा पाटील यांच्या सोबत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या आशीर्वादानेच चौधरी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे.

बहुमताची जुळवाजुळव आणि 'घोडेबाजार'

advertisement
नारायण चौधरी यांनी काँग्रेसचे ३३, स्वतःचे १३, राष्ट्रवादी (शरद पवार गट), अपक्ष आणि विकास आघाडीच्या नगरसेवकांची मोट बांधून ४६ हा बहुमताचा आकडा पार केल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे, शिवसेना (१२), भाजपचे उरलेले ९, आणि इतर छोट्या पक्षांच्या मदतीने संख्याबळ जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र ते अद्याप बहुमतापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.
advertisement

शिवसेनेची 'वेट अँड वॉच'ची भूमिका

या संपूर्ण गोंधळात शिवसेनेने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवसेनेचे १२ नगरसेवक कोणाच्या पारड्यात वजन टाकणार, याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. २० तारखेला होणाऱ्या मतदानापूर्वी भिवंडीत मोठ्या प्रमाणावर 'घोडेबाजार' सुरू असल्याची चर्चा असून, नक्की सत्ता कोणाची येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, दुसरीकडे भाजपने शिवसेनेच्या १२ नगरसेवकांचा पाठिंबा आपल्याला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Congress BJP: महाराष्ट्राच्या राजकारणात चमत्कार! भाजपच्या उमेदवारासाठी चक्क काँग्रेसचा 'व्हिप'; भिवंडीत नवा भूकंप!
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement