मुस्कानचं मुंडक छाटलं अन् शरीराचे केले 2 तुकडे, नवऱ्याचं भयानक कृत्य, भिवंडीतील प्यारवाली लव्ह स्टोरीचा भयानक एंड!

Last Updated:

नवऱ्यानेच बायकोच मुडकं छाटलं आणि तिच्या शरीराचे दोन तुकडे करून तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे दोन वर्षापुर्वी दोघांचं लव्ह मॅरीज झालं होतं.

bhiwandi crime news
bhiwandi crime news
Bhiwandi Crime News : नरेश पाटील, भिवंडी : भिवंडीच्या खाडी लगतच्या ईदगाह झोपडपट्टीजवळीत दलदलीत धडावेगळं शिर आढळल्याची घटना घडली होती. 30 ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आली होती.त्यानंतर या शिरावरून या व्यक्तीची ओळख पटवण्यापासून ते हत्येचा उलगडा करण्यापर्यंत पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पण पोलिसांनी या आव्हानाचा स्विकारत हत्येचा उलगडा केला आहे.या प्रकरणात नवऱ्यानेच बायकोच मुडकं छाटलं आणि तिच्या शरीराचे दोन तुकडे करून तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे दोन वर्षापुर्वी दोघांचं लव्ह मॅरीज झालं होतं. पण आज या लव्हस्टोरीचा भयानक शेवट झाला. त्यामुळे बायकोवर जीवापाड प्रेम करणाऱ्या नवऱ्यानेच तिची हत्या का केली? हे जाणून घेऊयात.
ठाणे पोलिस उपायुक्त परिमंडळ 2 भिवंडीचे शशिकांत बोराटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या ईदगाह रोडवरील झोपडपट्टीच्या बाजूला असलेल्या खाडीमध्ये धडावेगळं शीर आढळल्याची घटना 30 ऑगस्टला घडली होती. या घटनेनंतर शीर असलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचा आणि हत्येचा तपास सूरू होता.या दरम्यान हलिफा खान नावाची एक महिला पोलीस स्टेशनमध्ये आली आणि तिने दोन दिवसांपासून मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.तसेच तिचा फोनही लागत नाही आहे आणि नवरा देखील प्रतिसाद देत नसल्याची माहिती मिळाली होती.
advertisement
या घटनेनंतर पोलिसांना संशय बळावला होता.त्यामुळे पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने हत्येची कबूली दिली होती. तहा अन्सारी असे या आरोपी नवऱ्याचे नाव आहे.तर मृत महिलेचे नाव परवीन ऊर्फ मुस्कार अन्सारी होते.

दोन वर्षापुर्वी झाला होता प्रेमविवाह

खरं तर दोन वर्षापूर्वी तहा अन्सारी आणि परवीन ऊर्फ मुस्कान अन्सारी यांचा प्रेमविवाह झाला होता.या लग्नापासून त्यांना एक वर्षाचा मुलगा देखील होता. लग्नानंतर काही वर्षात दोघांनी एकमेकांच्या चारीत्र्यावरून संशय घ्यायला सूरूवात केली होती.या संशयातून दोघांमध्ये कडाक्याची भांडणे व्हायची. यासोबत मुस्कान इंस्टाग्रामवर रिल्स देखील बनवायची. त्यासाठी तिला काही मुलं देखील भेटायला यायची. यामुळे त्यांच्यात आणखी भांडणे व्हायची. तसेच मुस्कान तिच्या मुलाला देखील मारहाण करायची यामुळे देखील त्यांच्यात खटके उडायची.
advertisement
याच सगळ्याचा राग मनात धरून तहा अन्सारीने 29 ऑगस्टला मुस्कानची निर्घृणपणे हत्या केली होती. या हत्येनंतर त्याने पत्नीचे शिर धडावेगळे करीत तिच्या शरीराचे दोन तुकडे केले आणि खाडीत भरतीचे पाणी वाहत असताना त्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीने ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बोटीच्या सहाय्याने धडाचा शोध सूरू केला आहे.पण त्यांना यश आले नाही आहे.
advertisement
दरम्यान या प्रकरणात आरोपी तहा अन्सारी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच त्याला भिवंडी न्यायालयात हजर केले असता 11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या घटनेने भिवंडी हादरलं आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुस्कानचं मुंडक छाटलं अन् शरीराचे केले 2 तुकडे, नवऱ्याचं भयानक कृत्य, भिवंडीतील प्यारवाली लव्ह स्टोरीचा भयानक एंड!
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement