भिवंडी महापालिका महापौर निवडणुकीला नवे वळण, भाजपने ऐनवेळी महापौरपदाचा उमेदवार बदलला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
नारायण चौधरी यांच्याऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला.
नरेश पाटील, प्रतिनिधी, ठाणे : भिवंडी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महापालिकेतील सत्तास्थापनेच्या घडामोडी रोज नव्या वळण घेत आहेत. कोणता पक्ष सत्तास्थापनेचा दावा करून संख्याबळाचे समीकरण जुळवणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले असताना महापौरपदाच्या निवडणुकीला नवे वळण लागले. भाजपने ऐनवेळी महापौरपदाचा उमेदवार बदलला आहे.
नारायण चौधरी यांच्याऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला. दुसरीकडे पक्षाच्या बदललेल्या निर्णयानंतरही नारायण चौधरी यांनी महापौरपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाच्या निर्णयानंतर नारायण चौधरी नाराज असल्याचे कळते.
भाजपकडून स्नेहा मेहुल पाटील उमेदवार
स्नेहा मेहुल पाटील यांना संधी देत असल्याची अधिकृत घोषणा भाजप शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी केली. नगरसेवकांना लेखी पत्राद्वारे निर्णयाची माहिती देखील कळविण्यात आली. महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत राजकीय घडामोडींना वेग आलेला असून अंतर्गत घडामोडींवर नगरसेवकही लक्ष ठेवून आहेत.
advertisement
भिवंडीत भाजप चंद्रपूर पॅटर्न राबवण्याची तयारी करतीये. इकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवली पॅटर्ननुसार रणनीती आखली आहे. भिवंडीत सत्तास्थापन करण्यासाठी काँग्रेस, भाजप, सेक्युलर फ्रंट आदी पक्ष इच्छुक आहेत. भिवंडी पालिकेत भाजपाचे २२ शिवसेना शिंदे गटाचे १२, एक अपक्ष असे ३५ चे संख्याबळ आहे. बहुमतासाठी ४६ चे संख्याबळ आहे. परंतु हा जादुई आकडा गाठण्यासाठी सगळ्याच पक्षांची तारांबळ उडाली आहे.
advertisement
सेक्युलर फ्रंटकडून महापौरपदासाठी जुळवाजुळव
दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि समाजवादी पार्टी असा सेक्युलर फ्रंट महापौरसाठी तयार झाला होता, पण कितीही प्रयत्न केले तरी त्यांना आपला महापौर बसविण्यासाठीची समीकरणे जुळत नसल्याचे सांगितले जाते.
भिवंडीत काय होऊ शकते?
भाजपचा एक गट काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोबत घेऊन महापौर पदाची निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
शिंदेंच्या शिवसेनेला माजी महापौर विलास पाटील यांनी जवळीक साधल्याने मोठी राजकीय घडामोड
भाजपाचे महापौर पदाच्या उमेदवार बदलाच्या घडामोडीवरून नाराज झालेला नारायण चौधरी समर्थक नगरसेवक काँग्रेस, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार, सेक्युलर फ्रंट गटात सामील होण्याची शक्यता
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 5:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भिवंडी महापालिका महापौर निवडणुकीला नवे वळण, भाजपने ऐनवेळी महापौरपदाचा उमेदवार बदलला








