प्रशांत किशोर बिहारच्या रणांगणात झिरो का झाले? काय कारण आहेत?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी वेगवेगळ्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या रणनीतीनं विजय मिळवला होता. मात्र स्वत:च्याच पक्षाला प्रशांत किशोर विजयी का करू शकले नाहीत?
मुंबई : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी अनेक नेत्यांना यश मिळवून दिलं. मात्र त्यांची रणनीती त्यांच्याच उपयोगी पडली नाही. त्यामुळे राजकीय रणनीतीत हिरो ठरलेले प्रशांत किशोर बिहारच्या रणांगणात झिरो ठरले. तर चिराग पासवानांनी कमी जागा लढवून विजय मिळवत हीरो सारखी कामगिरी केली.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर बिहारच्या निवडणुकीत सपशेल अपयशी ठरले. अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी वेगवेगळ्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या रणनीतीनं विजय मिळवला होता. मात्र स्वत:च्याच पक्षाला प्रशांत किशोर विजयी का करू शकले नाहीत? त्याची काय कारण आहेत?
ग्रामीण भागातील कमी ओळख प्रशांत किशोर यांना महागात पडली. संघटनेचा पाया कमजोर असल्यामुळे त्यांचा पक्ष मतदारांपर्यंत पोहोचला नाही. जातीय समीकरणांना आव्हान देण्यात अपयश आलं. मुस्लीम मतदारांनी भाजपला हरवण्यासाठी महागठबंधनला मतं दिली, याचा फटका जनसुराज पार्टीला बसला. निवडणूक लढवणार नाही, हा प्रशांत किशोर यांचा निर्णय चुकीचा ठरला. जनसुराजनं पक्षाच्या बांधणीऐवजी प्रशांत किशोर यांच्या ब्रँडिंगवर जास्त लक्ष दिलं, आणि हेच त्यांना महागात पडलं.
advertisement
राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर अपयशी ठरले. तर दुसरीकडे चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीनं अवघ्या 29 जागा लढवून जवळपास 20 जागा जिंकल्या. 2020 च्या निवडणुकीत अवघी 1 जागा जिंकणारे चिराग पासवान यावेळी हीरो ठरले.
बिहारच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं होतं. बिहारच्या निवडणुकीची मॅच सत्ताधाऱ्यांनी जिंकलीय. या मॅचमध्ये विरोधक पराभूत झाले. तर प्रशांत किशोर शुन्यावर बाद झाले. तर दणदणीत यश मिळवणारे चिराग पासवान लक्षवेधी ठरले.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
November 14, 2025 10:52 PM IST


