advertisement

घाणेवाडी जलाशयावर हिवाळ्यात परदेशी पक्ष्यांची गैरहजेरी का? धक्कादायक कारण समोर

Last Updated:

यंदा मराठवाड्यातील घाणेवाडी जलाशय आणि परिसरात या पक्ष्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.

+
स्थलांतरित

स्थलांतरित पक्षी

नारायण काळे - प्रतिनिधी, जालना : हिवाळ्याचे आगमन होताच परदेशी पक्ष्यांच्या आगमनाची प्रतीक्षा केली जाते, मात्र यंदा मराठवाड्यातील घाणेवाडी जलाशय आणि परिसरात या पक्ष्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. जालना जिल्ह्यातील संत गाडगेबाबा जलाशय, कुंबेफळ पाझर तलाव, आणि मोतीबाग मोती तलाव हे स्थलांतरित तसेच स्थानिक पक्ष्यांचे आवडते थांबे मानले जातात. मात्र यंदा लांबलेला पाऊस, वाढलेले प्रदूषण, आणि बदललेले हवामान या कारणांमुळे परदेशी स्थलांतरित पक्ष्यांनी येथे न येण्याचा निर्णय घेतल्याचे जाणवते.
पक्षी स्थलांतराचा हंगाम आणि आव्हाने
पक्षी निरीक्षक ज्ञानेश्वर गिराम यांनी सांगितले की, हिवाळ्याच्या काळात स्थलांतर करणारे पक्षी गवताळ प्रदेश, पाणथळ जागा, आणि पानझड झालेल्या वनस्पतींमध्ये आपला अधिवास शोधतात. या हंगामात राजहंस (बार हेडेड गुज), मासे खाणारी घार (ऑस्प्रे), पांढुरक्या भुरक्या, आणि भुईत्या हे परदेशी पक्षी मराठवाड्यातील विविध जलाशयांमध्ये स्थलांतर करतात. मात्र, यंदा हे पक्षी अजूनही दिसून आलेले नाहीत.
advertisement
ज्ञानेश्वर गिराम पुढे सांगतात की, तुडुंब भरलेले जलाशय, वाढलेले ध्वनी आणि वायू प्रदूषण, तसेच पक्ष्यांना सहज अन्न न मिळणे यामुळे स्थलांतरित पक्ष्यांनी जलाशयांकडे पाठ फिरवली आहे. परंतु स्थानिक पक्ष्यांची संख्या मात्र चांगली आहे.
स्थलांतरित पक्ष्यांची प्रतीक्षा आणि स्थानिक पक्ष्यांची रेलचेल
घाणेवाडी जलाशयामध्ये यंदा १९ प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद झाली आहे, ज्यात चमचा बदक, हळदी कुंकू बदक, हिरवे कबूतर, पारवा, भारद्वाज, आणि पाकोळी यांचा समावेश आहे. याशिवाय मोठा बगळा, राखी बगळा, वंचक, आणि पानकावळा यांसारखे पक्षीही येथे आढळून आले आहेत.
advertisement
हिवाळा जसजसा पुढे सरकेल, तसतसे परदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होण्याची अपेक्षा पक्षी मित्रांना आहे. परंतु त्यासाठी पर्यावरणीय अडथळे दूर करणे आवश्यक असल्याचे ज्ञानेश्वर गिराम यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
घाणेवाडी जलाशयावर हिवाळ्यात परदेशी पक्ष्यांची गैरहजेरी का? धक्कादायक कारण समोर
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement