BMC Election: भाजप-शिंदे यांच्या पहिल्याच फेरीत १४२ जागांचा तिढा सुटला, कोणत्या जागांवर कुणाचा दावा? वाचा...
- Reported by:Tushar Rupnavar
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मुंबई महापालिकेच्या जागावाटपासंदर्भात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
तुषार रुपनवर, प्रतिनिधी, मुंबई : महापालिका निवडणुकांची घोषणा होताच निवडणुकांसाठी सदा सर्वकाळ तयार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मित्रपक्ष शिवसेनेशी जागा वाटपाची बोलणी सुरू केली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत अनेक जागांसंदर्भात सखोल चर्चा झाली. महायुतीच्या पहिल्याच फेरीत १४२ जागांचा तिढा सुटल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मुंबई महापालिकेसाठी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न झाली. जागावाटपासंदर्भातील वाटाघाटी तसेच प्रचाराच्या नियोजनाच्या अनुषंगाने उभय पक्षात सखोल चर्चाही झाल्याची माहिती आहे.
महायुतीच्या पहिल्याच फेरीत १४२ जागांचा तिढा सुटला
महायुतीच्या पहिल्याच फेरीत १४२ जागांचा तिढा सुटलेला असून शिवसेनेला ५२ तर भाजपच्या वाट्यास पहिल्या बैठकीत ९० जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. १४२ जागांसंदर्भात कोणताही तिढा नसून तेथील उमेदवारही अंतिम झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यातील काही जागांवर भाजपचा दावा, मुस्लीम बहुल मतदार संघ शिवसेनेला सोडण्याची तयारी
ठाकरे गट आणि काँग्रेसच्या ताब्यातील जागांवर पुढील बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यातील काही जागांवर भाजपने दावा सांगितला आहे. तर मुस्लीम बहुल मतदार संघ मात्र शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी असल्याचे कळते.
advertisement
शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेटपणे लढत होणार
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ताब्यातील बहुतांश जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार आहे. जेणेकरून शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेटपणे लढत होऊन खरी शिवसेना कुणाची? याचा निर्णय मुंबईकरच घेतील, अशी यामागे रणनीती आहे. जवळपास ५५ माजी नगरसेवकांन ठाकरेंची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने शिंदे यांचे पारडेही जड मानले जात आहे. दरम्यान, सविस्तर चर्चेअंती भाजप आणि शिवसेनेने दावा केलेल्या जागांवर गुरुवारी निर्णय होणार असल्याची माहिती आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 16, 2025 7:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: भाजप-शिंदे यांच्या पहिल्याच फेरीत १४२ जागांचा तिढा सुटला, कोणत्या जागांवर कुणाचा दावा? वाचा...







