एक पॅटर्न अन् दोन शिकार, शिंदे-दादांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा खास डाव, पडद्यामागून करेक्ट कार्यक्रम?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
'राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया राज्य सरकारने ३१ जानेवारी २०२६पर्यंत पूर्ण करावी,' असे आदेश दिले आहेत. दरम्यान, महायुतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. 'राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया राज्य सरकारने ३१ जानेवारी २०२६पर्यंत पूर्ण करावी,' असे आदेश दिले आहेत. यानंतर आता राज्यातील सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, महायुतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती एकत्रित लढवेल, तर ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र व शिवसेना स्वतंत्रपणे रिंगणात उतरू शकते. तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजप-शिवसेना एकत्र आणि राष्ट्रवादी स्वतंत्र्यपणे निवडणूक लढू शकते' असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे दिले.
advertisement
'राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया राज्य सरकारने ३१ जानेवारी २०२६पर्यंत पूर्ण करावी,' असे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने नुकतेच दिले. त्यानुसार राज्यातील २९ महानगरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषदा आणि २८९ पंचायत समित्यांच्या निवडणुका न्यायालयाने निर्धारित केलेल्या मुदतीत पार पाडणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात युती, आघाडीच्या चर्चांना वेग आला आहे. फडणवीस नवी दिल्ली येथे आले असता, त्यांनी याबाबत भाष्य केले.
advertisement
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार राज्यातील २९ महानगरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषदा आणि २८९ पंचायत समित्यांच्या निवडणुका निर्धारित मुदतीत घेणे राज्य सरकारला बंधनकारक आहे. यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
या आदेशाच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे माध्यमांशी अनौपचारिक चर्चा करताना महायुतीच्या धोरणाबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी सांगितलं की, बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस) एकत्र लढेल. मात्र, जिथे युती शक्य नसेल, अशा काही ठिकाणी 'मैत्रीपूर्ण लढती' होतील. 'नको तिथे युती केली, तर आमचे मतदार अन्य पक्षांकडे वळण्याची शक्यता आहे,' असेही त्यांनी अधोरेखित केले.
advertisement
फडणवीस पुढे म्हणाले, मुंबई महापालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढेल. मात्र पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढेल. तर ठाणे महापालिका निवडणूक भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र व शिवसेना स्वतंत्रपणे लढवू शकते,' असे ते म्हणाले. खरं तर ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे, तर पिंपरी चिंचवड आणि पुण्यात अजित पवार गटाची चांगली ताकद आहे, अशा स्थितीत अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप वेगळा पॅटर्न राबवण्याच्या तयारीत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 10:39 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एक पॅटर्न अन् दोन शिकार, शिंदे-दादांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा खास डाव, पडद्यामागून करेक्ट कार्यक्रम?