कोव्हिड काळ गाजवणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी का घेतले ताब्यात? FIR समोर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Dr Sangram Patil Police FIR: संग्राम पाटील हे वैद्यकीय क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. सध्या ते ब्रिटनमध्ये वैद्यकीय सेवा बजावत आहेत. भाजप नेत्यांवर टीकात्मक मांडणी केल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे.
मुंबई : केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीकात्मक मांडणी केल्याच्या आरोपावरून लंडनस्थित डॉक्टर संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुंबई विमानतळावरून आज सकाळी त्यांना ताब्यात घेतले. मुंबईतील ना.म. जोशी पोलीस स्टेशनमध्ये त्यांची चौकशी सुरू आहे. भाजपच्या एका कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीवरून डॉ. पाटील यांना ताब्यात घेतले आहे.
संग्राम पाटील हे वैद्यकीय क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. सध्या ते ब्रिटनमध्ये वैद्यकीय सेवा बजावत आहेत. कोरोना काळात भारतात भीतीदायक वातावरण असताना त्यांच्या समाज माध्यमांवरून ते लोकांना धीर देत होते. तसेच भारत सरकारच्या अनेक योजना आणि निर्णयांवरही ते आपली मते मांडत असतात. यातूनच त्यांची प्रतिमा भारतसरकारविरोधी असल्याचा आरोप केला जातो.
advertisement
डॉ. संग्राम पाटील यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावरून भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याकरिता तसेच भाजप विचारधारेचे समर्थन करणारे आणि त्याचा विरोध करणारे समाजातील गटांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याच्या इराद्याने चुकीची आणि खोटी माहिती पसरवली, असा आरोप भाजप कार्यकर्ते निखिल भामरे यांनी केला आहे.
एफआयआरमध्ये काय म्हटलंय?
निखिल श्यामराव भामरे, (वय 25, रा. ठाणे) मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचा सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून काम पाहतो. तसेच मी विविध इलेक्ट्रॉनिक सोशल मीडियाद्वारे आमच्या पक्षाची कार्यपद्धती आणि पक्षाचे कामकाजाबाबत नियमितपणे पाहणी करीत असतो.
advertisement
आज दि. 18/12/2025 रोजी मी नेहमी प्रमाणे कारणे पक्ष कार्यालयात येत असताना नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर सक्रिय होतो. त्यावेळी डिझाईल रोड लोअर परेल मोनो रेल स्टेशन जवळून जात असताना 10.19 वाजताचे दरम्यान माझ्या निदर्शनास आले की, शहर विकास आघाडी या फेसबुक खातेदाराकडून त्याचे फेसबुक खात्यावर दि. 14/12/2025 रोजी 01.58 वा खालील लिंक मध्ये आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचे मी पाहिले. सदर प्रसारित केलेला मजकूर हा आमच्या पक्षाच्या भारतातील प्रमुख नेत्यांबद्दल तसेच आमच्या पक्षाबद्दल द्वेषता पसरवण्यासाठी प्रसारित केल्याचे दिसून येत आहे.
advertisement
सदर मजकुरामध्ये एक महिलेच्या बाबत देखील आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केल्याचे दिसून येत आहे.
सदर शहर विकास आघाडी फेसबुक आयडीची लिंक पुढीलप्रमाणे आहे:-
तसेच त्यांनी केलेल्या उपरोक्त पोस्टची लिंक
तसेच डॉ. संग्राम पाटील या फेसबुक खातेदाराने देखील त्याचे फेसबुक खात्यावर दि. 14/12/2025 रोजी 17.02 वाजता खालील लिंक मध्ये आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचे मी पाहिले. सदर प्रसारित केलेल्या मजकुरातून आमच्या पक्षाच्या भारतातील प्रमुख नेत्यांबद्दल तसेच आमच्या पक्षाबद्दल अवमानकारक आणि द्वेषता पसरवण्यासाठी प्रसारित केल्याचे दिसून येत आहे.
advertisement
सदर डॉ. संग्राम पाटील यांच्या फेसबुक आयडीची लिंक पुढीलप्रमाणे आहे:-
तसेच सदर पोस्टची लिंक
मी उपरोक्त दोन्ही फेसबुक आयडीकडून प्रसारित केलेल्या फेसबुक पोस्टचे स्क्रीनशॉट काढले असून ते स्वाक्षांकित करून सादर करीत आहे.
तरी सदर फेसबुक आयडी धारक शहर विकास आघाडी आणि डॉ. संग्राम पाटील यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावरून आमचे पक्षाचे राष्ट्रीय नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याकरिता तसेच आमचे पक्षाचे विचारधारेचे समर्थन करणारे व त्यावर विरोध करणारे समाजातील गटांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याच्या इराद्याने चुकीची आणि खोटी माहिती जाणूनबुजून इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रसारित केली, म्हणून माझी फेसबुक आयडी धारक शहर विकास आघाडी व डॉ. संग्राम पाटील यांचे विरुद्ध कायदेशीर तक्रार आहे.
advertisement
सरकारने संग्राम पाटील यांची तत्काळ सुटका करावी, रोहित पवार यांचा इशारा
वैद्यकीय क्षेत्रात जगप्रसिद्ध असणारे, महाराष्ट्राचे सुपुत्र डॉ. संग्राम पाटील यांना करण्यात आलेली अटक महाराष्ट्राची मान खाली घालणारी असून मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पोलिसांना योग्य त्या सूचना देऊन त्यांची सुटका करण्याचे आदेश द्यावेत. कुणी विरोधात भूमिका मांडली म्हणून सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रकार महाराष्ट्रात शोभत नाही. या कारवाईबाबत सरकारचा जाहीर निषेध! सरकारने त्यांची तत्काळ सुटका करावी, अन्यथा डॉ. संग्राम पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या सकाळी त्या ठिकाणी यावं लागेल, असे रोहित पवार म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 5:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोव्हिड काळ गाजवणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी का घेतले ताब्यात? FIR समोर









