वडिलांची हत्या, आई तुरुंगात; बंडू आंदेकरची नात पहिल्यांदाच समोर; म्हणाली आता हे....

Last Updated:

आयुष कोमकर हत्या प्रकरणात वनराजची पत्नी सध्या तुरुंगात आहे. जेलबाहेर सोनाली आणि वनराजची लेकीने प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

News18
News18
पुणे :  पुण्यातील कुख्यात गुंड आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह त्याच्या कुटुंबातील लक्ष्मी आंदेकर आणि वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणात वनराजची पत्नी सध्या तुरुंगात आहे. आई तुरूंगात असली तरी बाहेर सोनाली आणि वनराजची लेकीने प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
पुण्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असेला प्रभाग म्हणजे 23 रविवार पेठ - नाना पेठ.... कारण गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तर दुसरीकडे बंडू आंदकरची तिसरी पिढी आता कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे,अशी भावना व्यक्त करत आहे.

आंदेकरची तिसरी पिढी प्रचारासाठी मैदानात

advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना राजकीय संधी देण्यात आल्याचा आरोप करत विरोधकांकडून तीव्र टीका केली जात आहे. सध्या दोन्ही उमेदवार कारागृहात असल्याने त्यांच्या वतीने  प्रभाग क्रमांक २३ मध्ये सोनाली आणि वनराजची लेक रिया घराघरात जाऊन प्रचर करत आहे. आज र पहिल्यांदाच रिया माध्यमांसमोर आली आणि तिने आपल्या भावना मांडल्या आहे.
advertisement

आता हे सगळं कुठेतरी थांबवा, आंदेकरची नात काय म्हणाली? 

रिया आंदेकर म्हणाली, लहानपणी मी वडिलांचा प्रचार पाहिला आहे. आज आई नसताना तिचा प्रचार करण्याची वेळ माझ्यावर आली आहे. वडिलांनी पाहिलेली स्वप्ने आम्हाला पूर्ण करायची आहेत. जे काही घडले, त्याची कल्पनाही आम्हाला नव्हती. आता हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. सध्या मी आणि माझी लहान बहीण एकट्याच राहत आहे.
advertisement
आम्ही जिथे जातो तिथे लोक आमच्या कुटुंबाने केलेल्या कामांची आठवण करून देतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, त्याला पात्र ठरण्याचा आम्ही प्रयत्न करू. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि सुरू असलेली विकासकामे पुढे नेणे हेच आमचे ध्येय आहे, असेही आंदेकरची नात म्हणाली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
वडिलांची हत्या, आई तुरुंगात; बंडू आंदेकरची नात पहिल्यांदाच समोर; म्हणाली आता हे....
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement