नवऱ्याचं नशीब चमकवतात 'या' तारखेला जन्मलेल्या मुली, पार्टनरसाठी ठरतात 'लकी चार्म'
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेला विशेष महत्त्व आहे. ज्याप्रमाणे राशीवरून व्यक्तीचा स्वभाव कळतो, तसेच मूलांकावरून त्या व्यक्तीचे गुण-दोष आणि नशीब समजते. अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या मुली त्यांच्या पतीसाठी अत्यंत भाग्यवान मानल्या जातात.
Numerology : अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेला विशेष महत्त्व आहे. ज्याप्रमाणे राशीवरून व्यक्तीचा स्वभाव कळतो, तसेच मूलांकावरून त्या व्यक्तीचे गुण-दोष आणि नशीब समजते. अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या मुली त्यांच्या पतीसाठी अत्यंत भाग्यवान मानल्या जातात. लग्नानंतर या मुलींच्या पावलांनी सासरी सुख-समृद्धी येते आणि पतीच्या करिअरमध्येही मोठी प्रगती होते. यंदाच्या नवीन वर्षात, जर तुम्ही जोडीदाराची निवड करत असाल किंवा तुमच्या पत्नीचा मूलांक 2, 3 किंवा 6 असेल, तर तुम्ही स्वतःला खूप नशीबवान समजू शकता. या तीन मूलांकांच्या मुली पतीसाठी 'लकी चार्म' का ठरतात.
मूलांक 2 - प्रेमाचा आणि शांतीचा आधार
ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 2 असतो. या मूलांकाचा स्वामी 'चंद्र' आहे. या मुली स्वभावाने अत्यंत शांत, समजूतदार आणि भावनिक असतात. त्या आपल्या पतीच्या प्रत्येक निर्णयाला खंबीरपणे साथ देतात. त्यांच्या संयमी स्वभावामुळे घरातील वातावरण आनंदी राहते, ज्यामुळे पतीला आपल्या कामावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करता येते. त्यांच्या आगमनानंतर पतीच्या आयुष्यात मानसिक स्थिरता येते, जी यशासाठी महत्त्वाची असते.
advertisement
मूलांक 3 - बुद्धिमत्ता आणि मार्गदर्शनाचा स्त्रोत
ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 3 असतो. या मूलांकाचा स्वामी 'गुरु' (बृहस्पती) आहे. गुरु हा ज्ञानाचा कारक आहे. मूलांक ३ असलेल्या मुली अतिशय हुशार आणि विचारी असतात. त्या पतीसाठी केवळ पत्नीच नाही, तर एक उत्तम 'सल्लागार' ठरतात. आर्थिक नियोजनात त्या पटाईत असतात. लग्नानंतर अशा मुलींच्या पतीला नोकरी किंवा व्यवसायात अनपेक्षित लाभ मिळतात आणि समाजात प्रतिष्ठा वाढते.
advertisement
मूलांक 6 - सुख-समृद्धी आणि वैभवाची जननी
ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 6 असतो. या मूलांकाचा स्वामी 'शुक्र' आहे. शुक्र हा ऐश्वर्य, प्रेम आणि चैनीचा कारक आहे. मूलांक 6 असलेल्या मुलींना 'लक्ष्मी'चे रूप मानले जाते. त्या सासरी पाऊल ठेवताच पतीच्या बंद नशिबाची कुलूपे उघडतात. अशा मुलींना लक्झरी लाइफ आवडते आणि त्यांच्या भाग्याने पतीलाही सर्व भौतिक सुखे मिळतात. या मुली पतीच्या आयुष्यात धनदौलत आणि रोमान्स दोन्ही टिकवून ठेवतात.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 5:35 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
नवऱ्याचं नशीब चमकवतात 'या' तारखेला जन्मलेल्या मुली, पार्टनरसाठी ठरतात 'लकी चार्म'











