WhatsAppचं नवं जबरदस्त फीचर! आता प्रोफाइल फोटोसह लावता येईल कव्हर ईमेज
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
WhatsApp iOS वर नवा कव्हर फोटो फीचर टेस्ट सुरु आहे. ज्यामुळे यूझर्सना फेसबुक आणि लिंक्डइन प्रमाणे आपल्या प्रोफाइल कव्हरमध्ये इमेज लावू शकाल. जाणून घ्या फीचर्सची पूर्ण डिटेल्स...
व्हॉट्सअॅपने iOS यूझर्ससाठी एक नवीन आणि इंट्रेस्टिंग फीचर आणण्याची तयारी सुरु केली आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी पर्सनल प्रोफाइलसाठी कव्हर फोटो फीचरवर काम करत आहे. या फीचरच्या मदतीने यूझर आपल्या प्रोफाइलमध्ये एक कव्हर फोटो लावू शकतील. तसंच जसं फेसबुक आणि लिंक्डइनसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतं.
advertisement
advertisement
रिपोर्टनुसार, हा कव्हर फोटो प्रोफाइल फोटोच्या अगदी वर दिसेल. याचा अर्थ असा की आता फक्त एक गोल प्रोफाइल फोटोच नाही तर त्याच्या वर एक मोठा बॅनरसारखा फोटो देखील असेल. हे फीचर नवीन आहे, परंतु पूर्णपणे अज्ञात नाही, कारण ते WhatsApp Business अकाउंटमध्ये आधीच अस्तित्वात आहे, जिथे बिझनेस यूझर्स त्यांचा ब्रँड किंवा ऑफर प्रदर्शित करण्यासाठी कव्हर फोटो वापरतात.
advertisement
advertisement
advertisement
खरंतर, हे फीचर सध्या टेस्टिंग स्टेजमध्ये आहे आणि ते सर्व यूझर्ससाठी कधी उपलब्ध होईल याबद्दल अधिकृत माहिती नाही. दरम्यान, व्हॉट्सअॅप सतत नवीन फीचर्स जोडत आहे. अलीकडेच, कंपनीने नवीन मेंबर टॅग, टेक्स्ट स्टिकर्स आणि इवेंट रिमाइंडर फीचर सादर केली आहेत. या अपडेट्सचा उद्देश यूझर्सचा अनुभव आणखी सुधारणे आहे.
advertisement








