Tata ची टँकसारखी कार आता घरी आणाच! कंपनीने किंमती केल्या कमी, खास ऑफर आली!
- Published by:Sachin S
Last Updated:
लवकरच टाटा पंचची फेसलिफ्ट लाँच होणार आहे. तर दुसरीकडे, जानेवारी महिन्यात टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय मॉडेलवर चांगलीच ऑफर आणली आहे.
मुंबई : टाटा मोटर्सने २०२६ च्या पहिल्या महिन्यात धडाका सुरू केला आहे. लवकरच टाटा पंचची फेसलिफ्ट लाँच होणार आहे. तर दुसरीकडे, जानेवारी महिन्यात टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय मॉडेलवर चांगलीच ऑफर आणली आहे. टाटाने ICE मॉडेल (पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी) कार आणि एसयूव्हीवर ही ऑफर दिली आहे.
टाटा मोटर्सने जानेवारी महिन्यात आपल्या लोकप्रिय वाहनांवर 85,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला आहे. ही ऑफर 31 जानेवरी 2026 पर्यंत असणार आहे. डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज बोनस आणि कॉरपोरेट डिस्काउंट याचा समावेश आहे. ही सवलत MY24 (2024 मॉडेल) आणि MY25 (2025 मॉडेल) दोन्ही प्रकाराच्या इन्वेंट्रीवर लागू आहे.
Tata Altroz - टाटा मोटर्सने अलीकडे Tata Altroz चं फेसलिफ्ट मॉडेल लाँच केलं आहे. टाटा मोटर्सने जानेवारी डिस्काउंट ऑफरमध्ये आपल्या लोकप्रिय मॉडेलवर सर्वाधिक 85,000 रुपयांची सूट मिळणार आहे. यामध्ये 60,000 रुपयांचा सरळ कॅश डिस्काउंट आणि 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. अलीकडेच लाँच झालेल्या फेसलिफ्टेड Tata Altroz वर कंपनीने 25,000 रुपयांपर्यंत सवलत दिली आहे.
advertisement
Tiago आणि Tigor वर विशेष डिस्काउंट
टाटा मोटर्सने आपल्या एंट्री लेव्हल कार Tiago आणि Tigor या दोन मॉडेलवर MY24 आणि MY25 व्हेरिएंट्स वर 35,000 रुपयांपर्यंत सूट दिली आहे. ही ऑफर टियागोच्या बेस व्हेरिएंट (XE) ला सोडून इतर सगळ्या मॉडेलवर उपलब्ध आहे. नवीन वर्षात टाटा मोटर्सने अपडेटेड इंटीरिअर आणि एक्सटीरिअरसह अनेक चांगल्या ऑफर दिल्याा आहेत.
advertisement
Punch, Nexon आणि Curvv वर खास ऑफर
टाटा मोटर्सने आपल्या एसयूव्हीवर सुद्धा चांगली ऑफर दिली आहे. लोकप्रिय Tata Punch वर 40,000 रुपयांपर्यंत सवलत दिली आहे. तर Tata Nexon च्या पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी व्हेरिएंट्सवर 50,000 रुपयांपर्यंत फ्लॅट सूट दिली आहे. अलीकडेच लाँच झालेल्या Tata Curvv वर सुद्धा 40,000 रुपयांपर्यंत बचत होणार आहे.
advertisement
Harrier आणि Safari वर किती डिस्काउंट?
view commentsटाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय प्रिमियम एसयूव्ही Harrier आणि Safari च्या डिझेल व्हेरिएंट्सवर कंपनीने 75,000 रुपयांपर्यंत खास डिस्काउंट दिला आहे. यामध्ये 25,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 50,000 रुपये एक्सचेंज/स्क्रॅपेज बोनसचा समावेश आहे. या शिवाय, SBI Yono आणि विशेष कॉरपोरेट स्कीममुळेही ग्राहकांची अतिरिक्त बचत होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 5:28 PM IST











