BJP : ''मोठेपणासाठी रडू नका...'' फडणवीस काकूंनी सुधीर मुनगंटीवारांचे कान टोचले

Last Updated:

Sudhir Mungantiwar : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे कान टोचले.

News18
News18
चंद्रपूर : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. विधीमंडळ अधिवेशनातही याचे संकेत दिसून येत होते. आता चंद्रपूरमधील भाजप स्थापना दिनाच्या निमित्ताने पक्षातील गटबाजी दिसून आली. भाजप आमदार किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतंत्र कार्यक्रम घेतले. जोरगेवार यांच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी यावेळी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे कान टोचले.
भाजपात गटबाजी नसल्याचा दावा केला जातो. मात्र, चंद्रपूरमध्ये ही गटबाजी उफाळून आल्याचे दिसले. चंद्रपुरात मुनगंटीवार समर्थक आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले. मुनगंटीवार यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयातल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र, जोरगेवार यांच्या कार्यक्रमाला दांडी मारली. तर, जोरगेवार यांनी भाजप स्थापना दिनाचा कार्यक्रम कन्यका सभागृहात आयोजित केला होता.
advertisement
आमदार जोरगेवार यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी हजेरी लावली होती. या वेळी त्यांचा पक्षाच्या वाढीसाठी केलेल्या संघर्षासाठी सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

आपली काँग्रेस झाली का... फडणवीस काकूंनी टोचले कान...

आमदार जोरगेवार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना शोभाताई फडणवीस यांनी आपल्या भाषणात पक्षातील गटबाजीवर बोट ठेवले. एकाच शहरात भाजपच्या स्थापना दिनाचे दोन कार्यक्रम का घेतले? आपली काँग्रेस झाली का? असा सवाल त्यांनी केला. जोरगेवार चंद्रपूरचे आमदार असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहणं आवश्यक होतं, छोट्या छोट्या मानसन्मानासाठी भांडू नका, स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका असे बोलत त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचेही कान टोचले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP : ''मोठेपणासाठी रडू नका...'' फडणवीस काकूंनी सुधीर मुनगंटीवारांचे कान टोचले
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement