'म्हातारं म्हातारीला चोळी शिवू द्यायचं नाही' भाजप नेते पाशा पटेलांचे जाहीरसभेत अश्लिल हातवारे, संपूर्ण VIDEO

Last Updated:

भाजपचे नेते पाशा पटेल यांनी कर्जत-जामखेडमध्ये जाहीर सभेत अश्लिल हातवारे करत अतिशय खालच्या भाषेचा वापर केला.

(पाशा पटेल)
(पाशा पटेल)
कर्जत : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. काही दिवसांपासून भाजपचे नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आता भाजपचे नेते आणि मंत्री पाशा पटेल यांची जीभ घसरली आहे. जाहीर सभेत बोलताना अश्लिल हातवारे करून पाशा पटेल यांनी काँग्रेसवर कमरे खालची भाषा वापरून टीका केली आहे.
विधानसभा निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात येऊ लागलाय. तसं-तसं नेत्यांची भाषा घसरू लागली आहे. भाजपचे नेते पाशा पटेल यांनी कर्जत-जामखेडमध्ये जाहीर सभेत अश्लिल हातवारे करत अतिशय खालच्या भाषेचा वापर केला. अश्लिल हातवारे करत त्यांनी काँग्रेसविरोधात अतिशय खालच्या भाषेचा वापर केला. ही भाषा ऐकून राज्यात का ओ पाशा काय तुमची अश्लिल भाषा अशी टीका सर्वत्र केली जात आहे.
advertisement
काय म्हणाले पाशा पटेल?
मुलसमानाने काही घाबरायचं कारण नाही. एका घरात एक म्हातारी आणि म्हातारं राहत होतं. अडचण अशी होती ही म्हातारं म्हातारीला चोळी शिवू देत नव्हता. एकेदिवशी रात्री २ वाजता एक चोर आला. चोर घरात आला आला, म्हातारी ठणणाणं बोलली आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली. आता म्हाताऱ्याने चोराला धरून मारलं पाहिजे होतं. पण म्हाताऱ्याने असं काही केलं नाही. त्याने उलट चोराचे आभार मानले, महिन्यातून एक दोन वेळा घरी असंच येत जा. तू आल्या शिवाय ही माझ्या गळ्यात पडणार नाही. तसे हे XXX खोर काँग्रेसवाले मुसलमान गळ्यात पडावे म्हणून अयं...अयं... करताय'
advertisement
त्यांना सत्तेची घमेंड - बाळासाहेब थोरात
दरम्यान, भाजपचे नेते पाशा पटेल यांनी कर्जत येथील एका जाहीर सभेमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. पाशा पटेल यांनी अंगविक्षेप करत केलेले भाष्य अगदी दुर्दैवी आहे, महायुतीच्या नेत्यांना काय झालंय, त्यांना कसली सत्तेची घमेंड आली आहे, अशी परिस्थिती असल्याने महिलांना पंधराशे रुपये दिले म्हणजे दम देऊन कोणत्याही परिस्थितीत मतं आपल्यालाच द्यावी असा दम देण्याचे आदेश वरतून आले आहेत, असाही प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'म्हातारं म्हातारीला चोळी शिवू द्यायचं नाही' भाजप नेते पाशा पटेलांचे जाहीरसभेत अश्लिल हातवारे, संपूर्ण VIDEO
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement