भाजप आमदाराचा कौतुकास्पद निर्णय, मुलीचे Admission केले शासकीय आदिवासी आश्रमशाळेत; म्हणाले- प्रसिद्धीसाठी नाही...

Last Updated:

MLA Sanjay Puram: इंग्रजी शाळांचा ग्लॅमर आणि हिंदी भाषेच्या वादाच्या काळात आमदार संजय पूराम यांनी समाजासाठी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. स्वतःच्या मुलीला खासगी शाळांऐवजी आदिवासी आश्रमशाळेत दाखल करून त्यांनी सरकारी शिक्षणाबाबतचा विश्वास दृढ करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

News18
News18
गोंदिया: राज्यात सध्या तिसरी भाषा हिंदीच्या सक्तीवरून मोठा वाद सुरू आहे. यासाठी ५ जुलै रोजी मराठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. एका बाजूला मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू असताना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या आणि नामांकित खाजगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी लाखो रुपये खर्च करत असताना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी मतदारसंघाचे भाजप आमदार संजय पुराम यांनी एक वेगळा आणि अनुकरणीय आदर्श घालून दिला आहे. त्यांनी स्वतःच्या मुलीला समृद्धी संजय पुराम हिला खासगी किंवा कॉन्व्हेंट शाळेत न घालता आपल्याच गावातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत आठवीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.
advertisement
आमदार पुराम यांच्या या निर्णयामुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे. पुराडा ढीवरीनटोला येथील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या या शासकीय शाळेत समृद्धीला दाखल करून त्यांनी केवळ आपल्या कुटुंबातच नव्हे तर संपूर्ण समाजात सरकारी शिक्षण संस्थांबद्दलचा विश्वास दृढ केला आहे. सरकारी शाळांमध्येही दर्जेदार शिक्षण मिळू शकते आणि त्या खासगी शाळांना पर्याय ठरू शकतात, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
advertisement
या निर्णयानंतर आमदार संजय पुराम यांनी सर्व पालकांना आवाहन केले आहे की, मुलांच्या शिक्षणासाठी केवळ खासगी शाळांचा विचार न करता,सरकारच्या शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता आणि उपलब्ध सोयी-सुविधांकडेही सकारात्मक दृष्टीने पाहावे.
लोकांना सांगायचं की आपल्या मुलांना आश्रम शाळेत टाका, आणि स्वतःच्या मुलांना खासगी शाळेत शिकवायचं, हा कुठला न्याय? म्हणूनच आज मी माझ्या स्वतःच्या मुलीला पुराडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत दाखल केलं. ही कृती कुठल्याही प्रसिद्धीसाठी नाही, ही आहे एक जाणीवपूर्वक चाललेली कृती म्हणजेच समाजात समता टिकवण्यासाठी, आणि गरीब, आदिवासी विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी म्हणून. आज माझ्या निर्णयाने जर समाजातील एक पालक सुद्धा शासनाच्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास ठेवून आपल्या मुलाचं भविष्य घडवायला पुढे येईल, तर हाच माझ्या या पावलांचा यशस्वी अर्थ आहे. असे आमदार संजय पुराम यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजप आमदाराचा कौतुकास्पद निर्णय, मुलीचे Admission केले शासकीय आदिवासी आश्रमशाळेत; म्हणाले- प्रसिद्धीसाठी नाही...
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement