'राष्ट्रवादीच्या उमेदवारीची भीती, लीड मोजायला लागली असती किती...!' अनगरमध्ये पाटलांची सून बिनविरोध पण विरोधकांचे गंभीर आरोप

Last Updated:

अनगर नगरपंचायत निवडणुकीत बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्राजक्ता पाटील यांचा जंगी स्वागत करण्यात आहे.

News18
News18
सोलापूर : अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी माजी आमदार, भाजप नेते राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या विरोधी उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर दुसऱ्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली. थिटे यांना आधी अर्ज भरण्यासाठी घ्यावे लागलेले पोलीस संरक्षण आणि त्यानंतर अर्ज बाद झाल्यानंतर ही निवडणूक राज्यभरात चर्चेत आली होती.
अनगर नगरपंचायत निवडणुकीत बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्राजक्ता पाटील यांचा जंगी स्वागत करण्यात आहे. उज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद केल्यानंतर दुसऱ्या अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. राजन पाटील यांच्या मातोश्री बंगल्यासमोर प्राजक्ता पाटील यांची उत्साहीत मिरवणूक काढण्यात आली. अनगर नगरपंचायत च्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून प्राजक्ता पाटील यांनी गावाचे मानले आभार मानले. अनगर गावात प्राजक्ता पाटील यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली.
advertisement
अनगरमध्ये 17 नगरसेवक बिनविरोध निवडून येऊन देखील उज्ज्वला थिटेंच्या उमेदवारीमुळे अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लागली होती. नगराध्यक्षपदासाठी केवळ तीनच अर्ज आले होते. भाजपकडून माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील य, उज्ज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि सरस्वती शिंदे यांनी अपक्ष अर्ज भरला होता.

अपक्ष सरस्वती शिंदेंचा अर्ज  मागे 

advertisement
नगराध्यक्षपदासाठी अवघे 3 अर्ज येऊनही प्रशासनाकडून बराच वेळ छाननीचे काम चालूच होते. उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज राहणार की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर छाननीत थिटे यांचा अर्ज बाद झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी जाहीर केले. त्यानंतर अपक्ष सरस्वती शिंदे निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अर्ज माघारी घेण्याचा दिवशी पहिल्या काही तासांतच शिंदे यांनी माघार घेतली. त्यानंतर वातावरण तापलेलं पाहायला मिळाले आहे.  'राष्ट्रवादीच्या उमेदवारीची भीती, लीड मोजायला लागली असती किती...!' अशा आशयाच्या चर्चा पाहायला मिळत आहे.
advertisement

उज्वला थिटे खऱ्या मर्दानी, अनगरकर पाटील पळपुटे, अर्ज बाद झाल्यानंतर राष्ट्रवादीची जहरी टीका

अनगर नगरपंचायतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर उमेश पाटलांनी राजन पाटलांवर जोरदार टीका केली आहे. अनगरकर पाटलांचा हा पळपुटे पणा पुन्हा सिद्ध झाला. किती ही मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते हे सिद्ध झालंय अशी टीका उमेश पाटलांनी केली आहे. अर्ज छाननीत बाद करून तुम्हीच जिंकला असला तरी लोक मतात उज्वला थिटे जिंकल्या. उज्वला थिटे खऱ्या मर्दानी आहेत तर अनगरकर पाटील हे पळपुटे आहेत, अशी जहरी टीका केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'राष्ट्रवादीच्या उमेदवारीची भीती, लीड मोजायला लागली असती किती...!' अनगरमध्ये पाटलांची सून बिनविरोध पण विरोधकांचे गंभीर आरोप
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement