निकालाआधी भाजपने उधळला गुलाल, अनगर परिषदेबाबच निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
- Reported by:Pritam Pandit
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत बिनविरोध घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता दिली आहे.
सोलापूर : काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्राचे लक्ष वेधले. कारण, मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 17 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याची औपचारिक घोषणा होणे बाकी होती. मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत बिनविरोध घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता दिली आहे. या संदर्भातील पत्र राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकऱ्यांना दिले आहे.
अनगर नगरपंचायतसाठी पहिल्यांदाच निवडणूक होतेय. मात्र, ही पहिलीचं निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलीय. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थिटे य यांचा अर्ज बाद झाल्यामुळे भाजपचे नेते राजन पाटील यांनी विजयी गुलाल उधळला. उज्वला थिटे यांनी अनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पण हे करण्यापूर्वी त्यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपमुळे हे प्रकरण चर्चेत आले. अनगर हे माजी आमदार राजन पाटील यांचे मूळ गाव, मागील 60 वर्षांपासून ह्या गावाची ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे.
advertisement
नेमकं काय म्हटलंय पत्रात?
२३/१२/२००४ च्या आदेशानुसार उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांवर तसे करण्यास कोणताही दबाव
आणलेला नाही. तसेच उमेदवार बिनविरोध निवडून येताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कुठल्याही
प्रकारची अनियमतता घडलेली नाही, जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांच्या विरूद्ध कोणतीही लेखी तक्रार अथवा न्यायालयीन प्रकरण दाखल झालेले नाही, याची खातरजमा जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर करण्यात
advertisement
आलेली आहे, असे अहवाल प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या संदर्भ क्रमांक ४ च्या प्राप्त अहवालामध्ये नमूद अनगर नगरपंचायतीच्या जागांसाठी उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यास राज्य निवडणूक अध्यक्ष व सदस्यपदाच्या देत आहे. आयोग या पत्राद्वारे मान्यता देत आहे.
अनगर नगरपंचायत निवडणुकीत सर्व 17 सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी केवळ एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने बिनविरोध जाहीर करण्यास आयोगाने मान्यता दिली आहे. उद्या सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन मुळीक हे अधिकृत घोषणा करणार आहे. तसेच सर्व विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी हे विजयाचे प्रमाणपत्र सुपूर्द करणार आहे. मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतमध्ये सर्व 17 प्रभाग आणि नगराध्यक्ष पदावर भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून प्राजक्ता पाटील या उमेदवार होत्या.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 9:33 PM IST









