नाशकात अजित पवारांचा डबल गेम, दादांच्या मंत्र्याला भाजपने घेरलं, 2 तगडे मोहरे गळाला
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू आहे. भाजपने अजित पवारांच्या मंत्र्याला घेरलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. आगामी निवडणुकीसाठी संबंधित पक्षांकडून पक्षबांधणी केली जात आहे. अशात नाशिक जिल्ह्यात भाजपने अजित पवारांची कोंडी केल्याची चर्चा आहे. भाजपने मागील पंधरा दिवसांत नाशिकमध्ये दोन तगडे मोहरे आपल्या गळाला लावले आहेत. जिल्ह्यात अजित पवारांच्या मंत्र्याला भाजपने घेरलं आहे. यामुळे भाजपकडून अजित पवारांचा डबल गेम झाल्याची चर्चा आहे.
मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने सिन्नरचे अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकटेंना मोठा झटका दिला होता. त्यांचा सख्खा भाऊ आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते भारत कोकाटे यांचा भाजपात पक्षप्रवेश करण्यात आला होता. आगामी निवडणुकीच्या तोंडावर हा माणिकराव कोकाटे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात होता.
advertisement
यानंतर आता भाजपने दुसरा मोहरा गळाला लावला आहे. शरद पवार गटाचे नेते उदय सांगळे यांचा भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. सिन्नर येथे ३ नोव्हेंबरला हा पक्षप्रवेश होणार आहे. सांगळे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मंत्री माणिकराव कोकटे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी १ लाखापर्यंत मतं घेतली होती.
advertisement

अशा महत्त्वाचा नेता भाजपने आपल्या गळाला लावला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात भाजपकडून अजित पवारांची कोंडी केली जात असल्याची चर्चा आहे. दोन बडे नेते भाजपच्या गळाला लागल्याने सिन्नरसह नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरणं पाहायला मिळणार आहेत.
मराठा-ओबीसी समीकरण साधलं
विशेष म्हणजे भाजपने माणिकराव कोकाटेंना गळाला लावत एक मराठा चेहरा आपल्या पक्षात घेतला आहे. तर उदय सांगळेंना सोबत घेत ओबीसी समीकरण पक्कं करण्याचा प्रयत्न देखील भाजपकडून होताना दिसत आहे. या सगळ्या घडामोडींमुळे भाजपने अजित पवारांचा नाशिकमध्ये डबल गेम केल्याचं बोललं जात आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
October 30, 2025 7:53 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशकात अजित पवारांचा डबल गेम, दादांच्या मंत्र्याला भाजपने घेरलं, 2 तगडे मोहरे गळाला


