BMC Election Results : ठाकरेंच्या बालेकिल्लात कोणत्या वॉर्डचा पहिला निकाल? थोड्याच वेळेत मतमोजणीला सुरुवात

Last Updated:

BMC Election Results: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबईत दरवेळेस साथ देणाऱ्या मराठी बहुल असलेल्या ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात काय होणार, याकडेही लक्ष लागले आहे

ठाकरेंच्या बालेकिल्लात कोणत्या वॉर्डचा पहिला निकाल? थोड्याच वेळेत मतमोजणीला सुरुवात
ठाकरेंच्या बालेकिल्लात कोणत्या वॉर्डचा पहिला निकाल? थोड्याच वेळेत मतमोजणीला सुरुवात
मुंबई: राज्यात आज 29 महापालिकांसाठी मतदान झालं. आज त्याचा फैसला होणार आहे. महानगरपालिकांवर कुणाचं वर्चस्व राहणार? राज्यात महायुतीला सत्ता स्थापन करण्यात यश मिळालं मात्र 29 महानगरपालिकांवर महायुतीला वर्चस्व मिळवता येणार का याचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबईत दरवेळेस साथ देणाऱ्या मराठी बहुल असलेल्या ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात काय होणार, याकडेही लक्ष लागले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे. गेल्या काही निवडणुकांमधील मतमोजणीदरम्यान झालेला गोंधळ टाळण्यासाठी, आता एकाच वेळी सर्व वॉर्डांची मतमोजणी न करता ती दोन वॉर्डची मतमोजणी करण्यात येणार आहे.
कशी होणार मतमोजणी?
शहरात एकूण २३ मतमोजणी केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक केंद्रावर साधारण दहा प्रभागांची जबाबदारी एका मतमोजणी अधिकाऱ्याकडे असणार असली, तरी एका वेळी केवळ दोनच प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत एकाच वेळी जास्तीत जास्त ४६ प्रभागांचेच मतमोजणीचे काम सुरू राहणार आहे.
advertisement
> एकूण १४ टेबलावर मतमोजणी पार पडणार
कमीत कमी ४ तर जास्तीत जास्त ८ राऊंड मध्ये मतमोजणी पार पडणार. सुरुवातीला १९३ आणि १९४ प्रभागाची मतमोजणी पार पडेल. त्यानंतर १९५ आणि १९६, मग १९७ आणि १९८ तर सगळ्यात शेवटी १९९ प्रभागाची मतमोजणी होणार
> कोणत्या प्रभागाचे किती राऊंड होणार ?
१९३ प्रभागाचे ६ राऊंड
advertisement
१९४ प्रभागाचे ८ राऊंड
१९५ प्रभागाचे ६ राऊंड
१९६ प्रभागाचे ७ राऊंड
१९७ प्रभागाचे ४ राऊंड
१९८ प्रभागाचे ६ राऊंड
१९९ प्रभागाचे ५ राऊंड
सुरुवातीला बॅलेट पेपरवरील मत मोजणी होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election Results : ठाकरेंच्या बालेकिल्लात कोणत्या वॉर्डचा पहिला निकाल? थोड्याच वेळेत मतमोजणीला सुरुवात
Next Article
advertisement
BMC Election: ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दावा
ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दाव
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे.

  • ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये पडद्याआड हातमिळवणीबाबत घडामोडी सुरू असल्याचा दावा

  • भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप...

View All
advertisement