BMC : कोणत्या समितीसाठी कुणाचे अर्ज दाखल, भाजपने कुणाकुणाला संधी दिली? संपूर्ण यादी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मुंबई महापालिकेतील स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती आणि बेस्ट समिती यांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची विहित मुदत सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत होती.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ पार पडल्यानंतर सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महानगरपालिका विशेष सभेत स्थायी समिती व सुधार समितीवर प्रत्येकी २६ सदस्यांची; शिक्षण समितीवर २२ महानगरपालिका सदस्यांची आणि ४ बिगर महानगरपालिका सदस्यांची तसेच 'बेस्ट' समितीवर १६ सदस्यांची नामनिर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. या चारही वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याकरिता महानगरपालिका सचिव कार्यालयाने विशेष सभेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
आज (बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६) स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती आणि बेस्ट समिती यांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची विहित मुदत सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत होती. या कालावधीत प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. शुक्रवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी, तर दुपारी २ वाजता स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. तर, सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सुधार समिती अध्यक्षपदासाठी आणि दुपारी २ वाजता 'बेस्ट' समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
advertisement
कोणत्या समितीसाठी कुणाचा अर्ज, भाजपने कुणाकुणाला संधी दिली?
बृहन्मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजेश्री शिरवडकर, सुधार समिती अध्यक्षपदासाठी संध्या दोशी (सक्रे), बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) समिती अध्यक्षपदासाठी श्रीमती तृष्णा विश्वासराव यांनी आपले उमेदवारी अर्ज महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे यांच्याकडे आज दाखल केले.
advertisement
तृष्णा विश्वासराव यांनी आपला उमेदवारी अर्ज ‘बेस्ट’चे सह सचिव सुशील पवार यांच्याकडे आज (बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६) दाखल केला. यावेळी सभागृह नेते गणेश खणकर, नगरसेवक, नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 7:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC : कोणत्या समितीसाठी कुणाचे अर्ज दाखल, भाजपने कुणाकुणाला संधी दिली? संपूर्ण यादी










