Buldhana News : बुलढाण्यात राजकीय भूकंप, काँग्रेसला धक्का, दिग्गज नेता महायुतीच्या वाटेवर!

Last Updated:

Buldhana News : बुलढाण्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या होम ग्राउंडवर धक्का बसणार असल्याचे म्हटले जात आहे.

News18
News18
राहुल खंडारे, प्रतिनिधी, बुलढाणा: बुलढाण्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्या होम ग्राउंडवर धक्का बसणार असल्याचे म्हटले जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे नेते समजले जाणारे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा लवकरच काँग्रेस सोडून महायुतीत सहभागी होतील अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगू लागली आहे.
काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार सानंदा यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यापासून ही चर्चा सातत्याने होत आहे. "जब तक जिंदा हू काँग्रेस का परिंदा हू" असं सानंदा यांनी म्हटल्यानंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा थांबल्या. मात्र पुन्हा एकदा दिलीप कुमार सानंदा यांच्या पक्षांतराच्या बुलढाणा जिल्ह्यात जोर धरू लागले आहेत.
advertisement

अजितदादा की शिंदे गट? 

काही दिवसांपूर्वी बुलढाणा झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेनंतर दिलीप कुमार सानंदा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार संजय गायकवाड यांच्या फार्म हाऊसवर जाऊन हनुमानाची चांदीची मूर्ती भेट दिली. तसा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. खामगाव शहरात लागलेल्या बॅनर्स वरून दिलीप कुमार सानंदा यांनी महाविकास आघाडीचे नेते हटवून महायुतीच्या नेत्यांचे फोटो लावलेत. त्यामुळे आता दिलीप कुमार सानंदा यांचे पक्षांतर जवळजवळ निश्चित मानलं जाऊ लागले आहे.
advertisement

 कारण काय?

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाच सदस्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रवेश हे त्यासाठी निमित्त समजलं जातं आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते समजले जाणारे कृषी उत्पन्न बाजार समितीतील पदाधिकाऱ्यांनीच काँग्रेस सोडली म्हटल्यावर आता दिलीप कुमार सानंदा यांचा मुहूर्त कधी ठरतोय याची खामगाव मतदारसंघासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना कमालीची प्रतीक्षा लागलीये.
advertisement

सानंदा म्हणतात,  मी अजून तरी...

महाराष्ट्र काँग्रेसची धुरा बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचे हाती दिल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात तरी काँग्रेसला उतरती कळा लागली असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे मोठे नेते विजय अंभोरे यांनी कधीच काँग्रेसचा हात सोडून हाती शिवसेनेचे धनुष्यबाण घेतलंय. त्यामुळे आता दिलीप कुमार सानंदा हे देखील काँग्रेस सोडतील अशा शक्यता वाढल्या आहेत. मात्र माध्यमांशी बोलताना दिलीप कुमार सानंदा यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करत आपण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Buldhana News : बुलढाण्यात राजकीय भूकंप, काँग्रेसला धक्का, दिग्गज नेता महायुतीच्या वाटेवर!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement