Crime News : गर्लफ्रेंडचे मेसेज पकडले, जाब विचारताच बेदम मारहाण! काँग्रेस नेत्याचा पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Last Updated:

Buldhana Crime News : पत्नीला आपल्या नवऱ्यावर संशय होता. रिकीच्या फोनमध्ये मुलींचे मेसेजेस पाहून दोघांमध्ये वाद पेटला होता.

Buldhana Congress youth leader attempts to burn wife
Buldhana Congress youth leader attempts to burn wife
Buldhana Congress leader : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात बाहेर मुलींशी अफेअरच्या संशयावरून पत्नीला जाब विचारणाऱ्या चिखली युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष विशाल काकडे याने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल काकडे याने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून, गॅस सुरू करून तिच्या साडीचा पदर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर संपूर्ण बुलढाण्यात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

रिकीच्या फोनमध्ये मुलींचे मेसेज...

विशाल उर्फ रिकी काकडे याची पत्नी नमिता दोन महिन्यांपासून नगर परिषदेमध्ये सफाई कामगार म्हणून कामं करत होती. काकडे दाम्पत्यास तीन आणि एक वर्षाचा मुलगा आहे. पत्नीला आपल्या नवऱ्यावर संशय होता. रिकीच्या फोनमध्ये मुलींचे मेसेजेस पाहून दोघांमध्ये वाद पेटला होता. 2020 मध्ये रिकी आणि नमिता यांचं लग्न झालं होतं. लग्नाच्या सहा महिन्यांतच सासू रेखा रघुवीर काकडे घरगुती कामांवरून टोमणे मारत मारहाण करू लागली.
advertisement

पत्नीने मोबाइल हिसकावला अन्...

मोठी नणंद भावना काकडे हे दोघं सासूचं ऐकून मारहाण करायचे, असा आरोप पिडीतेने केला आहे. पण घटनेच्या दिवशी पती विशालच्या मोबाइलवर एका मुलीचे मेसेज आले. त्यावेळी पत्नीने मोबाइल हिसकावला असता अनेक मेसेज दिसले. याबाबत विचारणा केली असता विशालने तिला मारहाण केली. सासू रेखा व नणंद भावनाने चिथावणी दिली अन् विशालने बॉटलमधील पेट्रोल नमिताच्या अंगावर ओतले अन् तिचा पदर गॅसला पेटवून दिला.
advertisement

ड्रममधील पाण्याने आग विझवली

नमिताने स्वत:ला सावरलं अन् लगेच ड्रममधील पाण्याने आग विझवली. पत्नी नमिता काकडे यांनी तत्काळ बाथरूममध्ये धाव घेऊन पदर पाण्याने विझविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर नमिताने मागं पुढं पाहिलं नाही अन् पती, सासू व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यामुळे आता विशालला शिक्षा होणार का? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Crime News : गर्लफ्रेंडचे मेसेज पकडले, जाब विचारताच बेदम मारहाण! काँग्रेस नेत्याचा पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
Next Article
advertisement
BJP Candidate List BMC Election: भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवारांची यादी...
भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवा
  • भाजपने आपल्या उमेदवार यादीत जुन्या चेहऱ्यांसह नवख्यांनादेखील संधी दिली आहे.

  • मुंबईत भाजपा 136, तर शिंदेंची शिवसेना 90 जागा लढवणार आहे.

  • मुंबई महापालिकेची सत्ता काबिज करण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे.

View All
advertisement