Buldhana : दार न उघडल्याने संतापलेल्या जावयाने केली दगडफेक, सासूने बॅटने केलेल्या मारहाणीत मृत्यू; पत्नीची पोलिसात धाव

Last Updated:

जवळा बुद्रुकमध्ये सासूच्या घरासमोर येत दीपकने दरवाजावर लाथा मारल्या. यावेळी मोठ मोठ्याने शिवीगाळही करत होता.

क्राइम न्यूज
क्राइम न्यूज
बुलडाणा : शेगाव तालुक्यात सासूने केलेल्या मारहाणीत जावयाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जवळा बुद्रुक इथं पत्नी तिच्या माहेरी गेली होती. पत्नीकडे गेला असताना सासू आणि पत्नी दार उघडत नसल्याने जावयाने दारावर दगड मारले. यामुळे संतापलेल्या सासूने मागच्या दाराने येत त्याला बॅटने मारहाण केली. या मारहाणीत जावयाचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेगावमधील फुलेनगर इथं राहणाऱ्या दीपकचे जवळामध्ये राहणाऱ्या वैष्णवीसोबत लग्न झाले होते. मात्र दीपक गजानन हाडोळे याला दारुचे व्यसन होते. त्याची पत्नी ४-५ वर्षांपासून आई सुशीला यांच्याकडे राहत होती. दीपक २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास दारू पिऊन सासूच्या घरासमोर आला होता.
जवळा बुद्रुकमध्ये सासूच्या घरासमोर येत दीपकने दरवाजावर लाथा मारल्या. यावेळी मोठ मोठ्याने शिवीगाळही करत होता. त्याने दगड मारून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पत्नी आणि सासू दरवाजा उघडत नसल्याने दीपक मोठ मोठे दगड दरवाजावर मारत होता.
advertisement
जावई दारात येऊन शिवीगाळ करत दगड मारत असल्याने सासू सुशीला संतापल्या. त्यांनी पाठीमागच्या दरवाजाने बाहेर येत जावयाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर लाकडी बॅटने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जावयाचा जागीच मृत्यू झाला. दीपकची पत्नी वैष्णवी हिने या प्रकरणी आईविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सासूला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana : दार न उघडल्याने संतापलेल्या जावयाने केली दगडफेक, सासूने बॅटने केलेल्या मारहाणीत मृत्यू; पत्नीची पोलिसात धाव
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement