Buldhana Crime : बुलढाणा जिल्ह्यात 9 महिन्यांत 557 मुली गायब, 90 अल्पवयीन, धक्कादायक कारणे समोर
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Buldhana Crime : बुलढाणा जिल्ह्यातून धक्कादायक आकडेवारी समोर आली असून 9 महिन्यांत 557 मुली गायब झाल्या आहेत. यात 90 अल्पवयीन मुलींचे किडनॅपिंग झाले आहेत.
बुलढाणा, 15 ऑक्टोबर (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांच्या जनसुनावणी त्यांनी घेतली. मात्र, गेल्या 9 महिन्यांत जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत. याशिवाय बुलडाणा जिल्ह्यात महिला, मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण सातत्याने वाढलेले आहे. जिल्ह्यात गेल्या 9 महिन्यांत 557 मुली व महिला गायब झालेल्या आहेत. यातील बहुतांश मुली या अविवाहित आहेत.
गेल्या 9 महिन्यांत बेपत्ता झाल्याची 844 प्रकरणे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यात 915 जण बेपत्ता झाल्याची नोंद आहेत. 915 पैकी 557 महिला तर 328 पुरुषांचा समावेश समावेश आहे. याशिवाय 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 90 मुली गायब झाल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणात किडनॅपिंगचे गुन्हे दाखल केले आहेत. 90 पैकी 55 जणींचा पोलिसांनी यशस्वी शोध घेतला असला तरी 35 अल्पवयीन मुली कुठे आहेत हे अद्याप समजले नाही. ज्या 55 मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आला, त्यापैकी काहींवर किडनॅपिंगनंतर बलात्कार झाल्याचाही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याशिवाय महिलांवरील अत्याचारांच्या इतरही अनेक घटना 9 महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात घडल्या आहेत.
advertisement
विनयभंगाची 278 प्रकरणे जिल्ह्यात दाखल झालेली आहेत. महिलांकडे वाईट नजरेने पाहणे, छेडछाड करणे, शरीरसुखाची मागणी करणे, वाईट उद्देशाने स्पर्श करणे अशा बाबी विनयभंग या प्रकारात मोडतात. याशिवाय जिल्ह्यात घरघुती हिंसाचाराची प्रकरणे देखील मोठी आहेत. 9 महिन्यांत अशी 85 प्रकरणे दाखल झाली आहेत.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
Oct 15, 2023 4:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana Crime : बुलढाणा जिल्ह्यात 9 महिन्यांत 557 मुली गायब, 90 अल्पवयीन, धक्कादायक कारणे समोर









