advertisement

बंटी जहागिरदार हत्या प्रकरण, दोन्ही मुख्य आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Last Updated:

अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूरमध्ये जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदार याची बुधवारी हत्या करण्यात आली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

News18
News18
हरीश दिमोटे, प्रतिनिधी अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूरमध्ये जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदार याची बुधवारी हत्या करण्यात आली. दोन जणांनी दुचाकीवरून येत जहागीरदारवर गोळ्या झाडल्या. एवढ्या मोठ्या प्रकरणातील हायप्रोफाईल आरोपीची अशाप्रकारे हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
गुरुवारी दोघांना कोपरगाव हद्दीतून अटक करण्यात आली आहे. जिल्हाभर करण्यात आलेल्या कडक नाकाबंदीमुळे आरोपींना पळून जाण्यात अपयश आलं आहे. बंटी जहागीरदारवर गोळीबार झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते.
या घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. अहमदनगर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमध्येही नाकाबंदीचे आदेश देण्यात आले होते. आरोपी रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगारे हे दोघे कोपरगावमार्गे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
advertisement
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी बंटी जहागीरदारची हत्या केल्याची कबुली दिली आहे. मयत बंटी जहागीरदारची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने जुन्या वादातून त्याची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.

बंटी जहागीरदारच्या हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी बुधवारी बंटी जहागीरदार कब्रस्तानमधून आपल्या घरी परत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या आरोपींनी अचानक येऊन त्यांच्यावर गोळीबार केला. रस्त्यावर गर्दी असतानाही आरोपींनी हा हल्ला केला. हल्ल्यानंतर तातडीने जहागीरदारला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बंटी जहागिरदार हत्या प्रकरण, दोन्ही मुख्य आरोपींच्या आवळल्या मुसक्या
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement