अपघाताने कुंकू पुसलं, 2 वर्षांच्या लेकीचं पितृछत्र हरपलं, भिवंडीतील तिसरी घटना, अपघाताचा VIDEO

Last Updated:

भिवंडीमध्ये अपघाताची मालिका काही केल्या कमी होत नाही. रस्त्यावर झाले खड्डे आणि त्यात बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांमुळे निष्पाप लोकांचा बळी जात आहे

नरेश पाटील, प्रतिनिधी
भिवंडी : मुंबईजवळील भिवंडीमध्ये अपघाताची मालिका काही केल्या कमी होत नाही. रस्त्यावर झाले खड्डे आणि त्यात बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांमुळे निष्पाप लोकांचा बळी जात आहे. अशातच भिवंडी वडपे मार्गावर झालेल्या अपघातात एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भरधाव कारने या तरुणाला ४० ते ५० फूट फरफटत नेलं होतं. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात शनिवारी भिवंडी वडपे मार्गावर भिनार गावाच्या हद्दीत हा अपघात झाला होता. भिवंडीहून वडप्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारचालकाने भिनार जकात नाका इथं समोरून जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली होती. हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव कारने स्कुटर चालकाला  40 ते 50 फूट फरफटत नेलं होतं. या अपघातात  दीपेश गुळवी (33) हा पत्नी प्रीती गुलवी (25)आणि दोन वर्षाची मुलगी कायरा गुळवी जखमी झाले होते.
advertisement
दीपेश गुळवी हे भिवंडीहुन निबंवली येथील घरी परत येते होते. या अपघातात दिपेश गुळवी हे गंभीरित्या जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान सहाव्या दिवशी दिपेश गुळवी यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. सहाव्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. दिपेश यांच्या मृत्यूमुळे २ वर्षांच्या कायराचे पितृ छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
बाप लेक दुचाकीवरून जाताना 20 दिवसात 3 अपघात
दरम्यान, भिवंडीत याआधीही अशाच घटना घडल्या होत्या. मुंबई-नाशिक महामार्गावरील डोहळे गावच्या हद्दीत 5 सप्टेंबरला झालेल्या अपघातात बाप लेकीचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील डोहळे गावाचे हद्दीत साईधाम लॉजिस्टनसमोर मुंबईवरून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी स्वारीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली होती. या घटनेत शहापूर तालुक्यातील सरलांबे गावातील राजेश अधिकारी (वय 39), मुलगी वेदिका अधिकारी (वय 11) या दोघा बापलेकीचा अपघातात दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
advertisement
दुचाकीवरून जाताना बाप लेकीचा आईच्या डोळ्या देखत मृत्यू
तर दुसरी घटना ही १८ सप्टेंबर रोजी घडली होती. भिवंडी तालुक्यातील भोईरगाव हद्दीतील साईधाराजवळ ही घटना घडली. नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने दुचाकीवरील सईम खोत (अंदाजे वय 48 वर्षीय)आणि मुलगी मरियम खोत ( अंदाजे वय 8 वर्षे) या बाप लेकीचा दुर्दैवी रित्या मृत्यू झाला होता. तर सुबी सहिम खोत ही गंभीर रित्या जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पडघ्या जवळील बोरिवली गावातील सहिम मकबूल खोत हे आपल्या पत्नी आणि मुलीसह दुचाकीवरून भिवंडीच्या दिशेने जात असताना, भोईर गावाच्या हद्दीतील साईधारा इथं पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिली, या  अपघातात बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सुबी खोत या  गंभीररित्या जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अपघाताने कुंकू पुसलं, 2 वर्षांच्या लेकीचं पितृछत्र हरपलं, भिवंडीतील तिसरी घटना, अपघाताचा VIDEO
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement