Central Railway : स्वस्त प्रवास तरी फुकट्यांचीच गर्दी; मध्य रेल्वेनं 7 महिन्यात वसूल केला 141 कोटींचा दंड
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी एप्रिल ते ऑक्टोबर 2025 या सात महिन्यांच्या कालावधीत 22 लाखांहून अधिक 'फुकट्या' प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
पुणे: मध्य रेल्वे विभागातून प्रवास करताना विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी एप्रिल ते ऑक्टोबर 2025 या सात महिन्यांच्या कालावधीत 22 लाखांहून अधिक 'फुकट्या' प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यातून तब्बल 141कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पुणे विभागाची मोठी कामगिरी
या कारवाईत पुणे विभागातील तिकीट तपासणी पथकाने लक्षणीय कामगिरी केली आहे.
पकडलेले प्रवासी: पुणे विभागात 2 लाख 67 हजार विनातिकीट प्रवासी पकडले गेले या कारवाईतून पुणे रेल्वे विभागाने 15 कोटी 57 लाख इतका विक्रमी दंड वसूल केला आहे. विशेषतः दिवाळी आणि छटपूजेच्या काळात पुणे, सातारा, कराड, मिरज आणि कोल्हापूर येथील महत्त्वाच्या स्थानकांवर तिकीट तपासणी पथकांनी विशेष मोहीम राबवली होती.
advertisement
मध्य रेल्वेच्या दंडात्मक कारवाईत मोठी वाढ
मध्य रेल्वेने पुणे, मुंबई, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर या पाचही विभागांत विशेष पथकांमार्फत विनातिकीट प्रवाशांवर नजर ठेवून दंडात्मक कारवाई केली आहे.
मुंबई विभागात सर्वाधिक फुकटे
गेल्या सात महिन्यांत सर्वाधिक फुकटे मुंबई विभागात सापडले आहेत. या विभागात नऊ लाख ५३ हजार लोकांवर कारवाई करून ४० कोटी ५९ लाख रुपये दंड वसूल केला आहे. भुसावळ विभागात सहा लाख जणांवरील कारवाईतून ५१ कोटी ७४ लाखांचा दंड वसूल केला आहे. पुणे विभागात दोन लाख ६७ हजार प्रकरणांतून १५ कोटी ५७ लाख, नागपूर विभागात दोन लाख ५३ हजार प्रकरणांमधून १५ कोटी ६२ कोटी रुपये, तर सोलापूर विभागात एक लाख ४१ हजार प्रकरणांमधून सहा कोटी ७२ लाख रुपये दंड वसूल केला आहे.
advertisement
मागील वर्षाच्या तुलनेत वाढ:
view commentsगेल्या वर्षी (२०२४-२५) मध्य रेल्वेने संपूर्ण वर्षात १२४.३६ कोटी दंड वसूल केला होता. मात्र, यंदा केवळ सात महिन्यांतच (एप्रिल ते ऑक्टोबर २०२५) ही वसुली १४१ कोटी वर पोहोचली आहे, जी फुकट्या प्रवाशांचे वाढते प्रमाण दर्शवते. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, सणासुदीच्या काळात गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 25, 2025 12:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Central Railway : स्वस्त प्रवास तरी फुकट्यांचीच गर्दी; मध्य रेल्वेनं 7 महिन्यात वसूल केला 141 कोटींचा दंड


