VIDEO: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ गेला अन् गळ्यात घातला हात, नाशिक हादरलं!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नाशिकच्या रामवाडी आणि नागपूरच्या अंजनी परिसरात नंदिनी नायक व अश्विनी मेश्राम यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्यांनी दिवसाढवळ्या हिसकावली, पोलिस तपास सुरू.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधि नाशिक: सही करण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रकार नागपुरात घडला होता. ही घटना ताजी असताना आता नाशिकमध्ये पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पळ काढल्याची घटना घडली आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका महिलेचा पाठलाग करून तिच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची चेन दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नाशिकच्या रामवाडी परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. नंदिनी नायक या महिलेने या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन चोरटे दुचाकीवरून आले आणि त्यांनी नंदिनी नायक यांचा त्यांच्या घरापर्यंत पाठलाग केला. घरासमोर आल्यानंतर त्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा केला.
advertisement
यावेळी एका चोरट्याने महिलेचे लक्ष विचलीत केले आणि दुसऱ्याने तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे घाबरून न जाता नंदिनी नायक यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण चोरटे वेगाने पसार झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, दिवसाढवळ्या घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
advertisement
नागपुरातही असाच धक्कादायक प्रकार समोर
पार्सल द्यायच्या कारणाने आलेल्या अज्ञात तरुणाने महिलेच्या गळ्यातील चेन खेचली आणि पळून गेला. नागपूर शहराच्या अंजनी परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली. पार्सल दिल्यानंतर महिलेला सही करण्याच्या बहाण्याने जवळ बोलावून तिच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अश्विनी मेश्राम असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून, त्यांनी या प्रकरणी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2025 11:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ गेला अन् गळ्यात घातला हात, नाशिक हादरलं!