रानफुलांच्या रंगांनी नटली चांदोली! 'उदगिरी पठारावर' फुलांचा बहार, आत्ताच करा ऑनलाईन बुकिंग
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Sangali News : शिराळ्यातील जागतिक वारसा स्थळ असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानात सध्या निसर्ग आपल्या रंगांची उधळण...
Sangali News : शिराळ्यातील जागतिक वारसा स्थळ असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानात सध्या निसर्ग आपल्या रंगांची उधळण करत आहे. हलका पाऊस, दाट धुके आणि गार वाऱ्याच्या सुखद वातावरणात 'उदगिरी पठारा'वर अनेक रानफुले फुलू लागली आहेत. कास पठाराच्या तुलनेत कमी गर्दीचे आणि शांत असलेले हे ठिकाण पर्यटकांना एक वेगळा अनुभव देते.
फुलांच्या दुनियेत हरवून जा!
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात या पठारावर अनेक दुर्मिळ प्रजातींची फुले पाहायला मिळतात. यात टोपली कार्वी, सितेचे आसवे, रान हळद, सीरोपिया, मिकी माऊस फ्लावर, धनगरी फेटा, जांभळी मंजिरी, निळी भारंगी, तेरडा, तुतारी, हळदी-कुंकू, टूथब्रश, ऑर्किड, गुढी अशा अनेक प्रकारच्या फुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अभ्यासकांसाठी इथे दुर्मिळ फुलांचा अभ्यास करण्याची संधी देखील आहे. त्यासाठी ऑनलाइन बुकिंगची सोय उपलब्ध आहे.
advertisement
निसर्गाची काळजी घ्या
या निसर्गरम्य ठिकाणी भेट देताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. फुलांना कोणताही धोका पोहोचणार नाही याची खबरदारी घ्या आणि आपल्यासोबत आणलेले प्लास्टिकचे साहित्य परत घेऊन जा. निसर्गाचे सौंदर्य जपण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
advertisement
हे ही वाचा : आदमापूरच्या बाळूमामांसमोर सर्व भक्त समान; आता VIP दर्शन मिळणार नाही, देवस्थान समितीने घालून दिले 'हे' नियम
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2025 8:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रानफुलांच्या रंगांनी नटली चांदोली! 'उदगिरी पठारावर' फुलांचा बहार, आत्ताच करा ऑनलाईन बुकिंग


