Chandrapur news: वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून मिठी मार..! विद्यार्थिनीचा शिक्षकांकडून विनयभंग, गुन्हा दाखल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
sexual harassment Chandrapur news: वाढदिवसाचं निमित्त करून या विद्यार्थिनीला शिक्षकांनी आपल्या रूमवर बोलावलं. वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून या आरोपी शिक्षकांनी तिच्याकडे मिठीची मारण्याची मागणी केली.
चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा येथील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात दोन शिक्षकांनी 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केला. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित विद्यार्थिनी बी.ए प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. प्रमोद बेलेकर आणि धनंजय पारखे अशी संशयित शिक्षकांची नावे आहेत.
वाढदिवसाचं निमित्त करून या विद्यार्थिनीला शिक्षकांनी आपल्या रूमवर बोलावलं. वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून या आरोपी शिक्षकांनी तिच्याकडे मिठी मारण्याची मागणी केली. मुलीने घाबरून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात बळजबरी करण्यात आली. तरीही त्यांच्या तावडीतून कशीबशी पळून आलेल्या पीडित मुलीने पालकांना याची माहिती दिली. त्यानंतर वरोरा पोलिसांनी पोक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
advertisement
घटनेची माहिती आणि गुन्हा दाखल होताच आरोपी दोन्ही शिक्षक फरार झाले आहेत. वरोरा शहरातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष या घटनेनंतर आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिक्षकांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मनसे, भाजप, बजरंग दल या पक्ष संघटनांनी या घटनेविरोधात आंदोलन करून आरोपी शिक्षकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. उद्या 31 ऑगस्ट रोजी वरोरा बंदची हाक देण्यात आली आहे.
Location :
Chandrapur,Maharashtra
First Published :
August 30, 2024 8:00 PM IST
मराठी बातम्या/चंद्रपूर/
Chandrapur news: वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून मिठी मार..! विद्यार्थिनीचा शिक्षकांकडून विनयभंग, गुन्हा दाखल