Accident News: क्षणात अख्खं कुटुंब संपलं; बायको अन् मुलीला घेऊन घरी निघालेला तरुण; रस्त्यातच काळाने घात केला
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
या घटनेत ट्रकने एका मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
हैदर शेख, चंद्रपूर 14 ऑगस्ट : रस्त्यावर वाहनं नेहमी सावधगिरी बाळगून हळू चालवण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः दुचाकीवर असताना तर विशेष काळजी घ्यावी लागते आणि आपलं हेल्मेटही सोबत ठेवावं लागतं. काही लोक हे नियमही मोडतात. पण कधी कधी असंही होतं, की खराब रस्त्यामुळे किंवा समोरच्याच्या चुकीमुळे अपघातात दुसराच कोणाचा जीव जातो.
चंद्रपूर जिल्ह्यातून एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ट्रकने एका मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण जखमी झाले आहेत. राजुरा शहराजवळील धोपटाळा येथे ही घटना घडली.
advertisement
या अपघातात निलेश वैद्य (32 वर्ष) त्यांची पत्नी रुपाली वैद्य (26 वर्ष) आणि मुलगी मधू वैद्य (3 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. धोपटाळा येथील गुरुदेव नगर येथे राहणारे निलेश वैद्य हे बल्लारपूर येथून आपल्या घरी परत जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला असून राजुरा पोलीस अपघातस्थळी दाखल झाले आहेत. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. इथून कोळसा वाहतूक होत असल्याने या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. मात्र प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.
advertisement
नागपूरच्या 2 युवकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यातूनही नुकतीच एक हृदयद्रावक घटना समोर आली होती. यात सिरोंचा तालुक्यात दोन युवकांचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. सुमन राजू मारसेट्टी (वय 15, रा. आसरअल्ली) आणि हिमांशू मून (वय 22, रा. न्यू बालाजी नगर) नागपूर अशी मृतकांची नावे आहेत. हिमांशू मून हा नागपूर येथून आपल्या काही मित्रांसह कार्यक्रमासाठी सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे गेला होता.
Location :
Chandrapur,Maharashtra
First Published :
August 14, 2023 8:17 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/चंद्रपूर/
Accident News: क्षणात अख्खं कुटुंब संपलं; बायको अन् मुलीला घेऊन घरी निघालेला तरुण; रस्त्यातच काळाने घात केला