Narendra Modi : 'दहशतवादाला काँग्रेसनेच पोसलं, त्यामुळेच..' मोदींचा सर्वात गंभीर आरोप
- Published by:Rahul Punde
Last Updated:
PM Modi Election campaign in Chandrapur : लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी जाहीर सभेतून मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.
चंद्रपूर : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूर जिल्ह्यात सभा पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात प्रचाराचा नारळ फोडला. चंद्रपूरमध्ये पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेतून काँग्रेसवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत. दहशतवादाला काँग्रेसने पोसल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. विशेष म्हणजे मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली.
नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
राजकीय पक्षाचं काम असतं की, लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे. पण काँग्रेस पहिल्यापासून अडचणीत होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विभाजन कुणी केलं. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर काश्मिरमध्ये अडचणी काँग्रेसने उभ्या केल्या. आपल्या आजूबाजूला अनेक देश प्रगती करत आहे. पण देश कुणामुळे अडचणीत आहे. देश कित्येक वर्ष दहशतवादाने ग्रासलेला होता. दहशतवाद्यांना कोण संरक्षण कोण देत होतं. काँग्रेस देत होती. माओवाद्याची लाल दहशत कुणामुळे वाढली ती काँग्रेसमुळेच वाढली.
advertisement
राम मंदिरांचा प्रश्न काँग्रेसमुळेच प्रलंबित
राम मंदिर निर्माणाचा विषय अनेक वर्षांपासून रखडलेला होता. राम मंदिराच्या कामात कोण अडथळा आणत होतं. राम मंदिराच्या कामाला विरोध करण्यासाठी कोर्टात जात होते. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर कुणी विरोध केला, बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कुणी दिला नाही., या सगळ्या अडचणीचं एकच उत्तर आहे काँग्रेस. दोन टर्मपासून काँग्रेस सत्तेतून बाहेर आहे. या 10 वर्षांमध्ये भाजपने चांगलं काम केलं. माओवाद कमी झाला आहे. आमचा गडचिरोली आता स्टील स्टेट होणार आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, कडू कारले, भरले, साखरेमध्ये घोळले तरी ते कडू ते कडू आहे. कारल्याला तुपामध्ये तळा किंवा साखरेच्या पाकेमध्ये बुडवले तरी कडूच्या कडू राहते, असा वाक्प्रचार मोदी यांना वापरला.
advertisement
मोदी कधी शाही कुटुंबात जन्माला आले नाही. गरिब कुटुंबातच माझा जन्म झाला आहे. दलित, वंचित हे तिच लोक आहे, त्यांच्या घरात विज नव्हती, पाणी नव्हतं, त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्यानंतर मोदींनी गॅरंटी दिली आहे की, वंचित वर्गासाठी काम करण्याचं ठरवलं आहे. केंद्र सरकारच्या पीएम आवास योजनेचा सगळ्यात जास्त फायदा हा दलित आणि आदिवासी समाजाला झाला आहे, असंही मोदींनी सांगितलं.
Location :
Chandrapur,Maharashtra
First Published :
April 08, 2024 6:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/चंद्रपूर/
Narendra Modi : 'दहशतवादाला काँग्रेसनेच पोसलं, त्यामुळेच..' मोदींचा सर्वात गंभीर आरोप