गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा, प्रेक्षकांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या, पाहा VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Gautami Patil Dance Video: प्रसिद्ध नृत्यंगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना होणारी प्रचंड गर्दी आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.
नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा: प्रसिद्ध नृत्यंगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना होणारी प्रचंड गर्दी आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. वर्धा शहरात आयोजित केलेल्या गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी अक्षरशः धुडगूस घातला आहे. मागच्या प्रेक्षकांना स्टेजवरील डान्स नीट दिसत नसल्याच्या कारणावरून हा राडा सुरू झाला आणि त्याची परिणती एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकण्यामध्ये झाली.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, काही संतप्त तरुण एकमेकांच्या दिशेने प्लास्टिकच्या खुर्च्या फेकत आहेत. इतकेच नव्हे, तर काही प्रेक्षक जमिनीवर खुर्च्या आदळून त्यांची तोडफोड करतानाही दिसत आहेत. या गोंधळामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
advertisement
पोलीस हस्तक्षेप, बाउन्सर उतरल्याने तणाव वाढला
प्रेक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर आयोजकांना गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांना देखील हस्तक्षेप करावा लागला. गोंधळ जास्त वाढल्यामुळे अखेर गौतमी पाटील हिचा डान्स कार्यक्रम काही वेळासाठी बंद करण्यात आला. दरम्यान, गोंधळ शांत करण्यासाठी आयोजकांकडून बाउन्सर प्रेक्षकांच्या गर्दीत उतरले. मात्र, बाउन्सर आणि प्रेक्षक यांच्यात मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली आणि त्यामुळे हा राडा अधिकच वाढला.
advertisement
वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा गोंधळ, एकमेकांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या... pic.twitter.com/S2sY71Aeje
— News18Lokmat (@News18lokmat) November 22, 2025
कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि खुर्च्यांची फेकाफेकी झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरू झाला, मात्र या घटनेमुळे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांच्या आयोजनातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
view commentsLocation :
Wardha,Maharashtra
First Published :
November 22, 2025 9:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा, प्रेक्षकांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या, पाहा VIDEO


