भुमरेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची सभा; म्हणाले 'गद्दारी झाली पण..'

Last Updated:

आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांची पैठणमध्ये सभा झाली.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर, सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी : आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांची पैठणमध्ये सभा झाली. पैठण हा शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्वाचंं लक्ष लागलं होतं. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? 
आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ' राज्यात दोन वर्षात जनतेचे हाल होत आहेत. परिस्थिती बिकट होत चालली आहे. सरकार बोलायला तयार नाही. दाल मे कूच काला नाही तर यांची संपूर्ण डाळच काळी आहे. आपली निवडणूक हरियाणा सोबत लावली नाही
महाराष्ट्रातील जनतेला हे घाबरले आहेत, महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही. आधी गद्दारी झाली होती, काही नियोजन नसतांना लोकांचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. उद्धव साहेब म्हणाले लोक आपल्यावर प्रेम करतात त्यांना भेटून ये. पैठणमध्ये गद्दारी झाली तरीही आज रॅली मोठी झाली. मी स्वतःची बॅटरी चार्ज करण्यासाठी आलो, मला पैठणमध्ये खूप प्रेम मिळते' असं आदित्य ठकरे यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभेची लढाई जिंकली, या मतदारसंघात आपला पराभव झाला. देशात आपण जिंकलो आहोत, हुकूमशाहीला वाटत होते 400 पार जाऊ,  मी म्हणालो हे 200 पेक्षा जात जात नाहीत. बहुमतात सरकार आले नाही, देशात माज चालत नाही हुकूमशाही चालत नाही हे देशाने दाखवून दिले, असा टोलाही यावेळी आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
भुमरेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची सभा; म्हणाले 'गद्दारी झाली पण..'
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement