'...म्हणून सरकार एक मिनिट सुद्धा सत्तेवर राहू नये'; दानवेंचा पुन्हा हल्लाबोल
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
छत्रपती संभाजीनगर, सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बदलापूर प्रकरणावरून त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 'राज्य सरकारचा पोलिसांवर धाक राहिला नाही, त्यामुळे सरकार एक मिनिट सुद्धा सत्तेवर राहू नये, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा' असं दानवे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे, यावर देखील अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शांततेत बंद असणार आहे, जनतेनं या बंदामध्ये सहभागी व्हाव असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान या बंदविरोधात ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाही मार्गानं बंद करण्याचा अधिकार आहे, कोर्ट दोन्ही बाजू ऐकूण घेईल, आम्हाला कोर्टानं बोलावलं तर आम्ही आमची बाजू मांडू, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागा वाटपावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणी काहीही केले तरी राज्यात सत्ता बदल होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व येणे अवघड नाही, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 23, 2024 1:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
'...म्हणून सरकार एक मिनिट सुद्धा सत्तेवर राहू नये'; दानवेंचा पुन्हा हल्लाबोल