Maharashtra politics : अमित शाहांच्या टिकेवर दानवेंचा पलटवार; म्हणाले 'देशाच्या 'उद्योग पळवे' गँगचे व्हाईस कॅप्टन महाराष्ट्रात..'

Last Updated:

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर, सिद्धार्थ गोदाम प्रतिनिधी :  भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. महाविकास आघाडी ही औरंगजेब फॅन क्लब असून त्यांचे नेते उद्धव ठाकरे असल्याचा घणाघात अमित शाह यांनी केला. ते भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. अमित शाह यांच्या या टीकेनंतर आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत जोरदार पलटवार केला आहे.
नेमकं काय म्हणाले दानवे? 
'दिल्लीतून महाराष्ट्रात नेत्यांच्या फौजा पाठवायच्या तुम्ही, अन औरंगजेबाचे नाव आम्हाला, वा रे वा? विरोधकांशी तुमचे असलेले बोलणे, वागणे, राजकीय दबाव टाकणे ही औरंगजेबी वृत्ती आज कोण पोसते आहे हे देश बघतो आहे.. देशाच्या 'उद्योग पळवे' गँगचे व्हाईस कॅप्टन महाराष्ट्रात आले होते, इथल्या मातीची, लोकांसाठी झगडणाऱ्या माणसांना काही तरी नावं ठेवायचे, घालून पाडून बोलायचे हा यांचा रटाळ अजेंडा लोकसभेत आपटी खाऊनही कायम आहे. राहिला प्रश्न संभाजीनगरचा.. बेगडी समर्थकांनी जे २०१४-१९ दरम्यान केले नाही, ते आम्ही केले. ती चिकलठाणा विमानतळाच्या नावाची फाईल तुमच्या टेबलावर धूळखात पडली आहे.. तेवढं होतं का बघा!' असा हल्लाबोल दानवे यांनी अमित शाह यांच्यावर केला आहे.
advertisement
advertisement
अमित शाह यांचा हल्लाबोल
अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. 'औरंगजेब फॅन क्बल कोण आहे? आघाडीवाले. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले आहेत. स्वत:ला बाळासाहेबांचा वारस सांगणारे कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्यांसोबत बसले. याकुबला सोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसोबत बसला आहात. झाकिर नाईकला मेसेंजर ऑफ पीस बनवणाऱ्यांसोबत बसला आहात. पीएफआयला सपोर्ट करणाऱ्यांसोबत बसला आहात. संभाजीनगरला विरोध करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे तुम्ही बसला आहात, तुम्हाला लाज वाटली पाहिजे' अशा शब्दात अमित शहांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Maharashtra politics : अमित शाहांच्या टिकेवर दानवेंचा पलटवार; म्हणाले 'देशाच्या 'उद्योग पळवे' गँगचे व्हाईस कॅप्टन महाराष्ट्रात..'
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement