Self Defense: आता लढायचं! 13 वर्षांपासून भाग्यश्रीने दिले 12 हजार मुलींना आत्मरक्षणाचे धडे

Last Updated:

गेल्या 13 वर्षांपासून त्या मुलींना आत्मरक्षणाचे धडे देत आहेत. आजपर्यंत त्यांनी जवळपास 12 हजार मुलींना तर पाच हजार महिलांना आत्मरक्षणासाठी घडविल्या आहेत.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगर सिडको परिसरात सकाळी आणि संध्याकाळी येथील वातावरणात एक आवाज घुमतो, तो आवाज म्हणजे आत्मविश्वासाने भरलेल्या आदेशांचा तसेच तयारीचा, हा आवाज असतो त्या मुलींचा, ज्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी झटत आहेत आणि या तयारीच्या मागे भाग्यश्री महाबळे आहे. गेल्या 13 वर्षांपासून त्या मुलींना आत्मरक्षणाचे धडे देत आहेत. आजपर्यंत त्यांनी जवळपास 12 हजार मुलींना तर पाच हजार महिलांना आत्मरक्षणासाठी घडविल्या आहेत. सध्या 150 मुली आत्मरक्षणाचे प्रशिक्षण घेत असल्याचे महाबळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
आजकाल बाहेर जाऊ नको वेळ झाली, लवकर परत ये अशा आई-वडिलांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या मुली आता म्हणतात कोणी धक्का देईल तर त्याला जमिनीवरच लोळवेन. हा बदल सहज नाही होत. त्यासाठी तायक्वांदो, ज्युडो असे विविध प्रकारचे खेळ शिकून आत्मरक्षण करता येते. फक्त मुलींनी तयारी दाखवली पाहिजे.
advertisement
एका आठवीत शिकणाऱ्या मुलीसोबत अंगावर शहारा आणणारा एक प्रसंग घडला. झाले असे की एक मुलगा रोज तिला त्रास द्यायचा. नंतर त्या मुलाचा शोध घेतला मात्र तो दिसला नाही. मग आत्मरक्षणाचे प्रशिक्षण घेतले आणि काही दिवसांनी चक्क त्या मुलाच्या घरी जाऊन त्याला चांगलाच धडा शिकवले. आज मी कुठेही जाताना भीत नाही, असे एका विद्यार्थिनीने सांगितले. त्यामुळे महिलांनी किमान आपले स्वतःचे रक्षण करता येईल एवढे तरी प्रशिक्षण घेतले पाहिजे.
advertisement
भाग्यश्री यांचे पती शंकर महाबळे हे देखील गेल्या 27 वर्षांपासून आत्मरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे काम करतात. लग्न झाल्यानंतर त्यांनी पत्नीला देखील आत्मरक्षणाचे धडे शिकवले. आणि त्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली स्वतःच्या आत्मविश्वासावर उभ्या राहिल्या आहेत. तसेच येथील 72 विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळवलेले आहेत.
view comments
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Self Defense: आता लढायचं! 13 वर्षांपासून भाग्यश्रीने दिले 12 हजार मुलींना आत्मरक्षणाचे धडे
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement