advertisement

सासू-सुनेचं कांड वाचलं, तर डोकं फिरल, अवघ्या तीन तासात..., 9 महिलांची तक्रार!

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरात नुकतेच खंडोबा यात्रा झाली. यामध्ये सासू-सुनेच्या विरोधात 9 महिलांनी पोलिसांत धाव घेतली.

Chhatrapati Sambhajinagar: सासू-सुनेचं कांड वाचलं, तर डोकं फिरल, अवघ्या तीन तासात..., 9 महिलांची तक्रार!
Chhatrapati Sambhajinagar: सासू-सुनेचं कांड वाचलं, तर डोकं फिरल, अवघ्या तीन तासात..., 9 महिलांची तक्रार!
छत्रपती संभाजीनगर : सध्या छत्रपती संभाजीनगरसह परिसरात मोठ्या प्रमाणात मंगळसूत्र चोरीच्या घटना घडत आहेत. अशातच साताऱ्यातून धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. खंडोबा यात्रेसाठी जमलेल्या गर्दीत मंगळसूत्र चोरट्यांनी दहशत माजवली. केवळ तीन तासांत तब्बल आठ महिलांच्या मंगळसूत्रांसह लहान मुलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या, चांदीचे कडे आणि इतर दागिने लंपास केले.
खंडोबा यात्रेतील दागिने चोरीच्या प्रकारात सातारा पोलिसांनी सासू आणि सुनेला अटक केली. सीमा काळे आणि कविता काळे अशी या सासू–सुनेच्या जोडीची नावे आहेत. मात्र पोलिसांच्या हातात येण्यापूर्वीच दोघींनी चोरलेले सर्व दागिने त्यांच्या टोळीच्या मदतीने पसार केल्याचे समोर आले आहे.
advertisement
‎खंडोबा मंदिर परिसरात यात्रेमुळे हजारो भाविकांची गर्दी झाली होती. 30 नोव्हेंबरची सुट्टी असल्याने सकाळपासूनच विविध जिल्ह्यांतून भाविकांची मोठी वर्दळ होती. याआधीच काही महिलांच्या सोनसाखळ्या चोरीला गेल्याने पोलिसांनी सतर्कता वाढवली होती. तरीही महिला चोरट्यांच्या टोळीने पोलिसांना चकवा देत दुपारी 2 ते 5 या तीन तासांत सलग चोरी केली. यात अंदाजे 4 ते 5 तोळ्यांचे दागिने लंपास झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले.
advertisement
‎गर्दीत गोंधळ उडाल्यानंतर नागरिकांच्या मदतीने सीमा आणि कविता काळे या दोघींना पकडण्यात पोलिसांना यश आले. दोघी मुकुंदवाडी परिसरात राहतात. विशेष म्हणजे, सीमा ही 9 महिन्यांची गर्भवती असल्याने पोलिसांनी तिला नोटिशीवर सोडल्याचे सांगितले. तर कविता काळे हिला आधीही यात्रेत संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. मंगळसूत्र चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
दरम्यान, पीडित दुर्गा शर्मा यांच्या तक्रारीवरून आठ ते नऊ महिलांच्या सोनसाखळी चोरीप्रकरणी एकत्रित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
सासू-सुनेचं कांड वाचलं, तर डोकं फिरल, अवघ्या तीन तासात..., 9 महिलांची तक्रार!
Next Article
advertisement
Explainer : प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरिकेला! पाहा नेमकं काय घडलं?
प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरि
  • प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचालनात केवळ भारताची लष्करी ताकद दिसली नाही

  • तर बदलत्या जगाचं नवं राजकारणही पाहायला मिळालं.

  • भारताने जगाला दिलेला एक मोठा 'जिओपॉलिटिकल मेसेज' होता.

View All
advertisement