Fake birth certificate: छ. संभाजीनगरात मोठी कारवाई, घाटीतील 2700 जन्म दाखले रद्द, कारण धक्कादायक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Fake birth certificate: बनवाट जन्मदाखले प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 2700 जन्मदाखले रद्द करण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील घाटी रुग्णालयातून मोठ्या प्रमाणावर अधिकाराशिवाय जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाच्या आदेशांशिवाय आणि आवश्यक मंजुरीशिवाय दिलेल्या या प्रमाणपत्रांमुळे शासकीय यंत्रणेची विश्वासार्हता प्रश्नचिन्हाखाली आली आहे. तपासात समोर आलेल्या 4900 प्रमाणपत्रांपैकी तब्बल 2700 प्रमाणपत्रे जिल्हा प्रशासनाने रद्द केली आहेत.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ही माहिती देण्यात आली. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत महसूल, आरोग्य आणि महानगरपालिका विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. प्रशासनाकडून आतापर्यंत 150 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, आणखी 30 ते 40 जणांवर लवकरच कारवाई होणार आहे.
advertisement
सोमय्यांनी या प्रकरणात बांगलादेशी नागरिकांना बोगस प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच, सिल्लोड तालुक्यातील 234 संशयित व्यक्तींविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व रद्द केलेली प्रमाणपत्रे परत घेण्यासाठी विशेष समिती स्थापन केली असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 28, 2025 10:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Fake birth certificate: छ. संभाजीनगरात मोठी कारवाई, घाटीतील 2700 जन्म दाखले रद्द, कारण धक्कादायक


