अचानक ब्रेक मारला अन् चिमुकल्याचा जीव गेला, छ. संभाजीनगरमध्ये विचित्र अपघात, उड्डाणपुलावर काय घडलं?

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये उड्डाणपुलावर झालेल्या विचित्र अपघातात चिमुकल्याचा बळी गेला. अपघातात तीन वाहने एकमेकांना धडकली.

अचानक ब्रेक मारला, उड्डाणपुलावर 3 गाड्या धडकल्या, विचित्र अपघातात चिमुकल्याचा मृत्यू
अचानक ब्रेक मारला, उड्डाणपुलावर 3 गाड्या धडकल्या, विचित्र अपघातात चिमुकल्याचा मृत्यू
‎छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात रस्ते अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे जीवितहानीच्या घटना अधिक गंभीर होत चालल्या आहेत. अशाच एका निष्काळजीपणातून शनिवारी दुपारी सेव्हनहिल उड्डाणपुलावर तीन वाहनांचा साखळी अपघात झाला. या भीषण धडकेत पाच वर्षीय अभिनव या बालकाचा मृत्यू झाला.
‎प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हायकोर्टाच्या दिशेने सुसाट वेगात जाणाऱ्या एका कारचालकाने उड्डाणपूल चढल्यानंतर अचानक ब्रेक लावला. त्याच वेळेला अंड्याची वाहतूक करणारी लोडिंग रिक्षा (एम एच-20-डीई-4298) त्या कारच्या मागे होती. समोरील कार अचानक थांबल्याने रिक्षाचालकाने ब्रेक दाबले व ती जागेवर थांबली. मागून असलेली कार (एम एच -20-एफ यु-3498) रिक्षावर आदळली. पाठोपाठ (एम एच 06 सिएल 9846) ही कार देखील पहिल्या कारवर आदळली.
advertisement
‎या अपघातात दोन्ही कारचे समोरून मोठे नुकसान झाले. शेवटच्या कारमध्ये समोरच्या सीटवर बसलेला पाच वर्षीय अभिनव गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने आकाशवाणी परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी मृतदेह बीड जिल्ह्यातील मूळ गावाकडे नेऊन रात्री 9 च्या सुमारास अंत्यसंस्कार केले.
advertisement
‎अपघातानंतर तिन्ही वाहनचालक आणि त्यांचे सोबती घटनास्थळावरून निघून गेले. जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिन्ही वाहने जप्त करून ठाण्यात जमा केली; परंतु रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार नोंदवली गेली नव्हती. मृत्यूबाबत माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी विविध स्थानिक आणि खासगी रुग्णालयांशी संपर्क साधला; मात्र अधिकृत नोंद मिळाली नाही, असे निरीक्षक सचिन कुंभार यांनी सांगितले. एका चिमुकल्याचा घेतलेला बळी पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करतो आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
अचानक ब्रेक मारला अन् चिमुकल्याचा जीव गेला, छ. संभाजीनगरमध्ये विचित्र अपघात, उड्डाणपुलावर काय घडलं?
Next Article
advertisement
''३१ मजल्यावरून मी...'', पंकजा मुंडेंच्या पीएने पत्नीच्या टोकाच्या पावलावर सगळंच सांगितलं, प्रकरणाला नव वळण?
पत्नीने गळफास घेतला, “३१ मजल्यावरून मी…”, अनंत गर्जेंने नेमकं काय सांगितलं?
  • ''३१ मजल्यावरून मी...'', पंकजा मुंडेंच्या पीएने पत्नीच्या टोकाच्या पावलावर सगळंच

  • ''३१ मजल्यावरून मी...'', पंकजा मुंडेंच्या पीएने पत्नीच्या टोकाच्या पावलावर सगळंच

  • ''३१ मजल्यावरून मी...'', पंकजा मुंडेंच्या पीएने पत्नीच्या टोकाच्या पावलावर सगळंच

View All
advertisement