Sambhajinagar Crime : हॉटेलमध्ये मित्रासोबत दारु प्यायली, पैसे घेतले... एक नंबर चुकला अन् रात्रभर तिघांकडून आळीपाळीने अत्याचार
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sambhajinagar Crime Woman molested : महिलेने आपल्या एका ओळखीच्या मित्राकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्या मित्राने तिला पैसे देण्यासाठी रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये बोलावले होते.
Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हॉटेलमध्ये घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून, एका चुकीच्या निर्णयामुळे एका महिलेला भयानक प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. ही घटना रेल्वे स्टेशन परिसरातील असून, या घटनेमुळे शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या 30 वर्षीय विवाहितेसोबत हा सर्व प्रकार घडला असून, एका साध्या चुकीमुळे ती नराधमांच्या तावडीत सापडली.
रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये बोलावलं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला पैशांची अत्यंत निकड होती, त्यामुळे तिने आपल्या एका ओळखीच्या मित्राकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्या मित्राने तिला पैसे देण्यासाठी रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. तो मित्र तिथे रुम नंबर 105 मध्ये थांबलेला होता. तिथे पोहोचल्यावर दोघांनी मद्यप्राशन केले आणि जेवणही केले. त्यानंतर काही वेळाने ही महिला फोनवर बोलण्यासाठी रूमच्या बाहेर आली होती.
advertisement
अवघ्या 3 तासांत तिन्ही आरोपींना ताब्यात
जेव्हा ही महिला पुन्हा रूममध्ये जाण्यासाठी निघाली, तेव्हा तिचा गोंधळ झाला आणि तिने चुकून 105 ऐवजी रुम नंबर 205 चे दार ठोठावलं. या एका चुकीमुळे ती भलत्याच लोकांच्या समोर गेली, ज्याचा फायदा घेत तिथे असलेल्या तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच वेदांतनगर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या 3 तासांत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलीस कडक कारवाई करत आहेत.
advertisement
स्वतःची सुटका करून घेतली
दरम्यान, पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास संधी मिळताच पीडितेने या नराधमांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. तिने आरडाओरड करत हॉटेलच्या बाहेर धाव घेतली आणि थेट वेदांतनगर पोलीस स्टेशन गाठून घडलेला सर्व प्रकार सांगितला.
view commentsLocation :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 8:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Sambhajinagar Crime : हॉटेलमध्ये मित्रासोबत दारु प्यायली, पैसे घेतले... एक नंबर चुकला अन् रात्रभर तिघांकडून आळीपाळीने अत्याचार










