चोरीला गेलेली दुचाकी अचानक दिसली, चौकशी केली तर..., छ. संभाजीनगरात भीतीचे वातावरण

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकी चोराने कहर केला आहे. चोरलेल्या दुचाकीबाबत विचारलं असता थेट हल्ला केला. परिसरात भीतीचे वातावरण आहे.

चोरीला गेलेली दुचाकी अचानक दिसली, चौकशी केली तर..., छ. संभाजीनगरात भीतीचे वातावरण
चोरीला गेलेली दुचाकी अचानक दिसली, चौकशी केली तर..., छ. संभाजीनगरात भीतीचे वातावरण
‎छत्रपती संभाजीनगर : शहरातील पुंडलिकनगर–विश्रांतीनगर परिसरात कुख्यात गुन्हेगार रितेश कुऱ्हाडे ऊर्फ कांचा याने एका साथीदारासह दुचाकी चोरी केली. त्यानंतर जाब विचारणाऱ्या दोघांवर स्क्रू-ड्रायव्हरने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (16 डिसेंबर) सकाळी घडली. ‘मी डॉन आहे’ अशी धमकी देत आरोपीने परिसरात दहशत निर्माण केली असून सर्वसामान्यांत भीतीचे वातावरण आहे.
‎या प्रकरणी अमोल अशोक रुडे (वय 39, रा. बंबाटनगर) यांनी तक्रार दिली असून ते खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. मंगळवारी सकाळी सुमारे आठ वाजता ड्युटीवरून घरी परतल्यानंतर परिसरातील नागरिकांनी रात्री चोरी झाल्याची माहिती दिली. शेजारी राहणारे भाडेकरू प्रकाश चव्हाण यांची दुचाकी अज्ञातांनी चोरून नेल्याचे समजल्यावर रुडे आणि चव्हाण हे दोघेही दुचाकीच्या शोधात निघाले.
advertisement
‎मुकुंदवाडी मार्गावरील विश्रांतीनगर परिसरात चोरीस गेलेली दुचाकी उभी दिसली. त्या ठिकाणी रितेश कुऱ्हाडे ऊर्फ कांचा आणि त्याचा एक साथीदार उपस्थित होते. चव्हाण यांनी दुचाकी आपली असल्याचे सांगून जाब विचारताच आरोपीने आक्रमक होत ‘मी डॉन आहे’ असे म्हणत मारहाण सुरू केली. रुडे यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्या हातावर स्क्रू-ड्रायव्हरने वार करून जखमी केले, तर चव्हाण यांनाही मारहाण करण्यात आली.
advertisement
‎दरम्यान, रितेश कुऱ्हाडे ऊर्फ कांचा याचा गुन्हेगारी इतिहास आधीपासूनच आहे. याच वर्षी मे महिन्यात मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात तलवार घेऊन दहशत माजवत चार रिक्षांच्या काचा फोडणे, रिक्षाचालकावर हल्ला करणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचा प्रकार घडला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, अल्पवयीन असल्याने तो सुटून बाहेर आला होता.
advertisement
‎सध्याच्या घटनेनंतर पुन्हा एकदा कांचाच्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
चोरीला गेलेली दुचाकी अचानक दिसली, चौकशी केली तर..., छ. संभाजीनगरात भीतीचे वातावरण
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement