Chhatrapati Sammbhajinagar: उड्डाणपुलावर विचित्र अपघात, छ. संभाजीनगरात चिमुकलीसोबत भयंकर घडलं, तरुण थेट...

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी रात्री उड्डापुलावर विचित्र अपघात झाला. यामध्ये चिमुकलीसह एकाला जीव गमवावा लागला.

Chhatrapati Sammbhajinagar: उड्डाणपुलावर विचित्र अपघात, छ. संभाजीनगरात चिमुकलीसोबत भयंकर घडलं, तरुण थेट...
Chhatrapati Sammbhajinagar: उड्डाणपुलावर विचित्र अपघात, छ. संभाजीनगरात चिमुकलीसोबत भयंकर घडलं, तरुण थेट...
‎छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही काळात छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी मध्यरात्री शहरातील मोंढा नाका येथील उड्डाणपुलावरून भरधाव जाणाऱ्या कारने सिटर रिक्षाला जोराची धडक दिली. यामध्ये एका 22 वर्षीय तरुणासह 5 वर्षीय चिमुरडी ठार झाली. ही कार रिक्षावर एवढ्या जोरात धडकली की, रिक्षातून उडून तरुण उड्डाणपुलावरून खाली जालना रोडवर पडून जागीच ठार झाला. यात अन्य चार जणही जखमी झाले आहेत.
आकाशवाणीकडून रिक्षातून क्र. एमएच 20 ईके 4557 सहा जण क्रांती चौकाकडे जात होते. मोंढा येथील उड्डाणपुलावरून जाताना पाठीमागून आलेली भरधाव कार (एमएच 20 जीक्यू 0221) त्या रिक्षावर आदळली. ही धडक एवढी जोरात होती की, रिक्षातून एक जण उड्डाणपुलावरून खालील रस्त्यावर सिंधी कॉलनीच्या बाजूने फेकला जाऊन जागीच गतप्राण झाला, तर एक 5 वर्षांची मुलगी जागीच ठार झाली. मृतांची नावे अख्तर रजा (वय 22) व जाहरा (वय 5, रा. जुना बाजार) अशी आहेत.
advertisement
‎अपघातानंतर कार उलटून ती विरुद्ध दिशेला वळली. अपघातप्रसंगी झालेला मोठा आवाज ऐकून व कुणीतरी खाली पडल्याचे पाहून तेथील रिक्षाचालकांनी तिकडे धाव घेतली. जखमीला रिक्षातून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अन्य काही चालकांनी उड्डाणपुलावर धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात नेले. जखमींवर उपचार सुरू आहेत.
advertisement
‎दरम्यान, जवाहरनगर पोलिसांनी धाव घेऊन उड्डाणपुलावरून एका बाजूची वाहतूक बंद केल्याचे पो. कॉ. रवींद्र शिंदे यांनी सांगितले. अपघातानंतर कारमधील तीन तरुण व तीन तरुणींनी कार सोडून पळ काढला. ही कार कुशलनगरमधील असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Chhatrapati Sammbhajinagar: उड्डाणपुलावर विचित्र अपघात, छ. संभाजीनगरात चिमुकलीसोबत भयंकर घडलं, तरुण थेट...
Next Article
advertisement
Sangamner Municipal Council Election Result 2025 :   खताळांची लाट की तांबेंची जादू? संगमनेरच्या मतमोजणीचा पहिला कल समोर
खताळांची लाट की तांबेंची जादू? संगमनेरच्या मतमोजणीचा पहिला कल समोर
  • खताळांची लाट की तांबेंची जादू? संगमनेरच्या मतमोजणीचा पहिला कल समोर

  • खताळांची लाट की तांबेंची जादू? संगमनेरच्या मतमोजणीचा पहिला कल समोर

  • खताळांची लाट की तांबेंची जादू? संगमनेरच्या मतमोजणीचा पहिला कल समोर

View All
advertisement