हिंजवडी हायड्रोपोनिक गांजा प्रकरणात धक्कादायक खुलासा, थेट संभाजीनगर कनेक्शन उघड
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Hinjewadi Case: पुण्यातील हिंजवडी गांजा प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. उच्च शिक्षित तरुणांचं थेट छत्रपती संभाजीनगर कनेक्शन पुढे आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात एक धक्कादायक प्रकार पुढे आला. एका आलिशान सदनिकेत अत्याधुनिक हायड्रोपोनिक पद्धतीने गांजाची लागवड करून त्याची विक्री केली जात होती. पुणे पोलिसांच्या कारवाईत पाच उच्चशिक्षित तरुणांना अटक केली असून, सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी तुषार वर्मा हा अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर खडकी परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याचे साथीदार सुमीत डेडवाल आणि अक्षय महेर हे पिंपरी-चिंचवड भागात राहत असल्याचे समोर आले.
advertisement
सखोल तपासात या आरोपींनी हिंजवडीतील एका सदनिकेत भाड्याने वास्तव्य करून तेथे हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींपैकी दोन युवक हे गंगापूर तालुका येथील असल्याचे समोर आल्याने स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गंगापूरमधील सुमीत संतोष डेडवाल आणि अक्षय सुखलाल महेर यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
उच्च शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्थिक सुबत्तेचा आडोसा घेत अमली पदार्थांचा काळा धंदा चालवला जात असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे समाजात चिंता आणि संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 11:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
हिंजवडी हायड्रोपोनिक गांजा प्रकरणात धक्कादायक खुलासा, थेट संभाजीनगर कनेक्शन उघड









